mla suresh gore booked bu police | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

आमदार सुरेश गोरे अवैध वाहतुकीवर चिडले; पण पोलिसांनी त्यांनाच अडकवले

हरिदास कड
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर चाकण परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने हजारो नागरिक वैतागले आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार सुरेश गोरे यांच्यावरील संताप सोशल मिडियातून व्यक्त करीत आहेत. त्यातून हतबल झालेल्या गोरे समर्थकांनी अवैध वाहतूक करणाऱ्यांना चोप दिला. मात्र त्यांनी कायदा हातात घेतल्याने गोरे यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर चाकण परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने हजारो नागरिक वैतागले आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार सुरेश गोरे यांच्यावरील संताप सोशल मिडियातून व्यक्त करीत आहेत. त्यातून हतबल झालेल्या गोरे समर्थकांनी अवैध वाहतूक करणाऱ्यांना चोप दिला. मात्र त्यांनी कायदा हातात घेतल्याने गोरे यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे आता अंगावर काटा येण्याचा प्रकार झाला आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी (ता. २६ आॅगस्ट) या दिवशी विक्रमी वाहतूक कोंडी होण्याची धास्ती होती. त्यामुळे या रस्त्यावरील अवैध वाहतूक थांबविल्याशिवाय कोंडी फुटणार नसल्याचे गोरे समर्थकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तीन पिअॅजिओ रिक्षांची तोडफोड केली.

येथील वाहतूक कोंडीला रिक्षांची अवैध वाहतूक जबाबदार आहे. ही अवैध वाहतूक पोलिसांनी बंद करावी अशी मागणी आमदार गोरे यांनी वारंवार पोलिसांकडे केली होती. तसेच अवैध वाहतुक बंद करण्यात यावी असा ठरावही नगरपरिषदेने केला होता. पोलिस अवैध वाहतुकीवर काहीच कारवाई करत नव्हते.

त्यामुळे आमदार गोरे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर सायंकाळी सात ते रात्री साडेआठच्या दरम्यान तळेगाव चौकात अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षांची हातात दांडके घेऊन तोडफोड केली. रिक्षाच्या काचा, दिवे यांची तोडफोड करण्यात आली. यामुळे रिक्षाचालक व इतर नागरिक यांच्यात घबराट झाली होती. रिक्षाचालकांची पळापळ झाली होती. याबाबत रिक्षाचालकाने तक्रार दिली आहे.

आमदार गोरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण मांजरे, नगरसेवक प्रवीण गोरे, लक्ष्मण जाधव, राहूल गोरे आदी व इतरांवर रिक्षांची तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गोरे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला.

याबाबत आमदार गोरे यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा दाखल करू द्या .त्यांना त्यांच्या पध्दतीने करू द्या. आम्ही आमच्या पध्दतीने समाजासाठी काम करतो आहे. अवैध वाहतूक कोणत्याही परिस्थितीत बंद झाली पाहिजे.
 

संबंधित लेख