mla sumantai patil about sangli collector | Sarkarnama

आर. आर. आबांच्या पत्नी सुमनताईंना जिल्हाधिकाऱ्यांकडून सापत्नभावाची वागणूक 

संपत मोरे
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

शासकीय अधिकारी आमच्याशी अस का वागत आहेत?

पुणे: "सांगलीचे जिल्हाधिकारी (विजयकुमार काळम पाटील) आम्हाला सापत्नभावाची वागणूक देत आहेत. विरोधी पक्षांच्या आमदारांना योग्य वागणूक दिली जात नाही," अशी खंत तासगाव कवठेमंहकाळच्या आमदार सुमनताई आर आर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सुमनताई म्हणाल्या, "आम्हाला शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिका मिळत नाहीत. आम्ही केलेल्या मागण्या मान्य होत नाहीत. मी दिवसांपासून तासगाव तालुक्यातील गावांना टँकर द्या, अशी मागणी करतेय पण त्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासकीय अधिकारी मात्र आमची टँकरची मागणी मान्य करत नाहीत. माझ्या अंजनी गावापासून पाच किलोमीटरवर मंत्रीमहोदयांचा दुष्काळ पाहणी दौरा केला. त्यावेळी मला निमंत्रण नव्हते. शासकीय अधिकारी आमच्याशी अस का वागत आहेत?"असा सवाल त्यांनी विचारला.  

संबंधित लेख