mla sumantai patil | Sarkarnama

आमदार सुमनताई पाटील यांच्या मोटारीला अपघात 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मे 2017

तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमन पाटील यांच्या मोटारीला किरकोळ अपघात झाला.

पुणे: माजी उपमुख्यमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांच्या पत्नी, तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमन पाटील यांच्या मोटारीला किरकोळ अपघात झाला. पश्‍चिम बाह्यवळण महामार्गावर वारजे माळवाडी येथील मुठा नदीच्या पुलावर ही बुधवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. 

आमदार पाटील मोटारीने मुलगा रोहित व पुतण्या रोहन (दोघांचे वय 23) यांच्यासमवेत साताऱ्याकडे जात होत्या. पुलावर मोटारीचे पुढील व पाठीमागील चाक पंक्‍चर झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मोटार चालकाच्या बाजूने पुलाच्या कठड्याला घासत गेली. मोटारीतील कोणालाही इजा झाली नाही, अशी माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव मोळे यांनी दिली. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे दोन तास संथ गतीने सुरू होती.  

संबंधित लेख