mla sumantai about tankers | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

आम्ही जनतेसाठी टँकर मागतोय, पण कोणीही दखल घेत नाही!

संपत मोरे 
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

शासकीय अधिकारी गंभीर  नाहीत.

पुणे : आम्ही जनतेसाठी टँकर मागतोय, पण कोणीही दखल घेत नाही. अस का झालं आहे?, अशी खंत आमदार सुमनताई पाटील यांनी व्यक्त केली आहे.

तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांना शासकीय अधिकारी सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा काही गोष्टी सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार पाटील तालुक्यातील ज्या गावात पाणीटंचाई आहे त्या गावासाठी टँकरची मागणी करत आहेत, काही गावात त्यांनी स्वतः टँकर सुरू केले आहेत. मात्र शासकीय पातळीवर त्यांच्या मागणीबाबत सकारात्मक हालचाली झालेल्या नाहीत.

त्या म्हणाल्या, आमच्या मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नाबाबत शासकीय अधिकारी गंभीर  नाहीत. मी लोकांसाठी  काही  मागणी केली तर ऐकत नाहीत. 

संबंधित लेख