चंद्रपुरात आमदार श्‍यामकुळे शोधतायेत हक्काचे घर : `पार्सल' ची टीका टाळण्याच्या तयारीत

चंद्रपुरात आमदार श्‍यामकुळे शोधतायेत हक्काचे घर : `पार्सल' ची टीका टाळण्याच्या तयारीत

चंद्रपूर : नाना श्‍यामकुळे गेल्या दहा वर्षांपासून चंद्रपूरचे आमदार आहेत. त्यांनी आता चंद्रपुरात हक्काचे घर शोधणे सुरू केले आहे. सध्या त्यांचे जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान भाड्याच्या घरात आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला या मतदार संघात मिळालेल्या मताधिक्‍क्‍याने समीकरणे बदलली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर त्यांनी हक्काच्या घराची शोधमोहीम सुरू केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर चंद्रपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यावेळी चंद्रपुरातील उमेदवार देण्याऐवजी भाजपने नागपुरातून श्‍यामकुळे यांना आयात केले. निवडणुकीच्या ऐन पंधरा दिवसआधी श्‍यामकुळे चंद्रपुरात आले आणि विजयी झाले. त्यानंतर 2014 मध्येही त्यांनी विजयी परंपरा कायम ठेवली. याकाळात त्यांनी जनसंपर्क कार्यालयासाठी येथील गंजवार्ड परिसरात एक घर भाड्याने घेतले. याच घरी
त्यांचे कार्यालय आणि निवासस्थान आहे.

पालकमंत्री, मंत्री किंवा पक्षाचा कार्यक़्रम असला, तरच श्‍यामकुळे चंद्रपुरात दिसतात. आठवड्यातून चार ते पाच दिवस श्‍यामकुळे नागपूरचे रहिवासी असतात. त्यामुळे त्यांना आजवर चंद्रपुरात हक्काच्या घराची गरज
पडली नाही, असे आता भाजपचे कार्यकर्तेच म्हणतात.

लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत
कॉंग्रेसला तब्बल 25 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. मागील तीस वर्षांच्या काळात प्रथमच या मतदार संघात कॉंग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे श्‍यामकुळेंसह भाजप नेतेही अचंबित झाले आहेत. एरवी भाजपचे मतदार, जातीय
समीकरण आणि पक्षाचे संघटन या भरवशावर हमखास निवडून येऊ, याच हवेत श्‍यामकुळे असायचे. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर ते सावध झाले. आता विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. बदललेली परिस्थिती कठीण आहे, याची जाणीव त्यांना आहे. त्यातच विरोधक श्‍यामकुळेंना "पार्सल'
ठरविण्याच्या तयारीत आहेत. या मुद्‌द्‌यातील हवा काढण्यासाठी श्‍यामकुळेंनी हक्काचा निवारा शोधणे सुरू केले, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com