आता 'वंचित'चा पर्याय शिल्लक आहे, असे शिवेंद्रराजे बोलताच सर्व गप्प झाले!

आहे तिथेच मी आहे असं स्पष्ट करून इकडे जाणार तिकडे जाणार, या चर्चेला त्यांनी पुर्ण विराम दिला.
आता 'वंचित'चा पर्याय शिल्लक आहे, असे शिवेंद्रराजे बोलताच सर्व गप्प झाले!

मेढा (सातारा) : सगळयांच्या मतानुसार आता सर्व पक्ष झाले. आता वंचित आघाडीचा पर्याय शिल्लक आहे. मग कायं करायचं तेच बरं दिसतय, असे म्हणताच उपस्थित सर्व मंडळी गप्प झाली. मी आहे तिथेच आहे, असे स्पष्ट करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी इकडे जाणार तिकडे जाणार... या चर्चेला पूर्णविराम दिला.

आज शिवसेनेचे मेढा (ता. जावली) शहरप्रमुख सचिन जवळ यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांच्या घरी जावून पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.  सचिन जवळ म्हणाले, 'बाबाराजे आता आपणही आमच्याकडे येताय. आम्ही वाट पाहतोय. लवकर या.' यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सगळयांच्या मतानुसार सर्व पक्ष झाले. आता वंचित आघाडीचा पर्याय शिल्लक आहे. मग कायं करायचं तेच बरं दिसतंय. असं म्हटल्यावर मात्र सगळेच गप्प झाली. आहे तिथेच मी आहे असं स्पष्ट करून इकडे जाणार तिकडे जाणार या चर्चेला त्यांनी पुर्ण विराम दिला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com