mla shivajirao naik about cabinet reshuffle | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

यावेळी सांगलीची निराशा होणार नाही : शिवाजीराव नाईक

संपत मोरे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

मला संधी मिळावी अशी अपेक्षा आहे!

पुणे : मंत्रीमंडळ विस्तारात याखेपेस सांगली जिल्ह्याला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे, पण कोणाला संधी द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. मीही याबाबत पक्षश्रेष्ठीना भेटून विनंती केली आहे, असे भाजपचे शिराळाचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी सांगितले.

''मी स्वतःही आग्रही आहे. सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, चारवेळा आमदार आणि राज्यमंत्री म्हणून मी काम केले आहे. मला संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून विनंती केली आहे. सांगली जिल्ह्यात भाजपचे एक खासदार आणि चार आमदार आहेत, एवढे यश कधीही मिळाले नव्हते. जनतेने भरभरून साथ दिली आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा विचार झाला पाहिजे. गेल्या चार वर्षापासून लोकांना प्रतीक्षा आहे. याखेपेस नक्की संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र कोणाला संधी द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. यावेळी सांगलीची निराशा होणार नाही'', असे नाईक म्हणाले.
 

संबंधित लेख