MLA Sharad Sonawne Requests Ajit Pawar for Junnar Seat | Sarkarnama

महाआघाडीतील झुकत्या मापासाठी आमदार सोनवणेंचे पवारांना साकडे

दत्ता म्हसकर
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

आगामी निवडणुकीसाठी होणाऱ्या महाआघाडीत मनसेच्या संभाव्य समावेशामुळे राज्यातील मनसेचे जुन्नर तालुक्याचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आघाडीत मला झुकते माप द्यावे, असे साकडे घातले. यामुळे आता जुन्नर तालुक्यात पुढील आमदार मनसेचा होणार की राष्ट्रवादीचा याबाबतच्या चर्चेने उचल खाल्ली आहे. 

जुन्नर :  आगामी निवडणुकीसाठी होणाऱ्या महाआघाडीत मनसेच्या संभाव्य समावेशामुळे राज्यातील मनसेचे जुन्नर तालुक्याचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आघाडीत मला झुकते माप द्यावे, असे साकडे घातले. यामुळे आता जुन्नर तालुक्यात पुढील आमदार मनसेचा होणार की राष्ट्रवादीचा याबाबतच्या चर्चेने उचल खाल्ली आहे. 

पवार येथे एका कार्यक्रमासाठी आले होते, यावेळी झालेल्या जाहीर सभेत आमदार सोनवणे यांनी चौफेर टोलेबाजी करत केलेल्या मागणीला पवार यांनी 'तुम्ही आमच्या सूचनेचा विचार करा आम्ही तुमच्या मागणीचा विचार करू,' असे उत्तर दिल्याने इच्छुकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. 

पाणी टंचाईची समस्या व पाणी नियोजनाबाबत बोलताना सोनवणे म्हणाले, ''दादा पाणी हा राजकारणाचा विषय नसून सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचा व सामाजिक व्यवस्थेचा विषय आहे. मी दादांच्या जवळ आहे. दादा उभ्या महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे मी कुणी वेगळा नाही, चहा पेक्षा किटली गरम अशी तालुक्यातील अवस्था आहे पण लोक हुशार आहेत." मनसे पक्ष फक्त तुम्हालाच कळला, असे दादा म्हणत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

''छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या राज्यातील राज्यकर्त्यानी तालुक्याला मंत्रीपद दिले नाही. मी एकटाच आहे. विटी-दांडू सारखे खेळ खेळत, जी जी करुन विकास कामे करत आहे, असे सांगत दादा आता मात्र तालुक्याला जिल्हा परिषदेचे पद द्या अशी मागणीही त्यानी केली. तसेच महाआघाडीत तालुक्याला झुकते माप द्या, असे सांगत त्यानी आपली आमदारकीची उमेदवारी येथे जाहीर केली.

संबंधित लेख