mla shambhuraj desai on tiger project | Sarkarnama

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे भूत पाटणकरांनीच जनतेच्या मानगुटीवर बसविले! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

'बैल गेला आणि झोपा केला' या म्हणीप्रमाणे माजी आमदार पाटणकर यांना उशीरा जाग आली आहे.

सातारा : कोयना वन्यजीव अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली. त्यावेळी तालुक्‍याचे आमदार विक्रमसिंह पाटणकर हेच होते. तालुक्‍यातील जनतेच्या मानगुटीवर व्याघ्र प्रकल्पाचे भूत बसले ते त्यांच्याच कार्यकालात. व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली त्याचवेळी ही गांवे वगळण्याकरीता पाटणकरांनी का तोंड उघडले नाही, असा प्रश्‍न पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला आहे.

सत्यजित पाटणकरांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले, 'बैल गेला आणि झोपा केला' या म्हणीप्रमाणे माजी आमदार पाटणकर यांना उशीरा जाग आली आहे. कोयना वन्यजीव अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली त्यावेळी आमदार कोण होते? या विभागातील जनतेच्या मानगुटीवर मग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे भूत कुणी आणून बसविले? तेव्हाच त्यांनी यासंदर्भात उठाव करुन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ठ झालेल्या या गावांवर अन्याय होत आहे, ही गांवे तात्काळ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वगळण्यात यावीत अशी आग्रही भूमिका का घेतली नाही? हातात असताना केले नाही आणि आता हातात नसताना सर्वात उग्र आंदोलन करण्याची भाषा पाटणकर करीत आहेत, हे हास्यास्पद आहे.  

संबंधित लेख