mla shambhuraj desai arrange meeting in pune | Sarkarnama

पाटणचे आमदार पुण्यात मांडणार कामाचा आढावा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

पुण्यात राहत असलेल्या लोकांशी ते संवाद साधणार आहेत.

सातारा : पाटण तालुक्यात केलेल्या कामाची माहिती पुण्यात राहणाऱ्या पाटणच्या रहिवाशांना मिळावी, यासाठी शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई पुणेकरांच्या भेटीला 17 फेब्रुवारीला जाणार आहेत.   

देसाई आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लेखाजोखा मांडत आहेत. पाटण तालुक्यातील मतदार, पण पुण्यात राहत असलेल्या लोकांशी ते संवाद साधणार आहेत. त्यासाठी शंभूराज युवा मंचने पुढाकार घेतला आहे. आकुर्डीत पुणे- मुंबई रस्त्यावरील बजाज ऑटोसमोरील श्रमशक्ती भवनात हा कार्यक्रम होणार आहे.   

संबंधित लेख