व्हाॅटसअॅपच्या माध्यमातून शंभर काॅलेज मित्र-मैत्रिणींचे गॅदरिंग - आमदार सीमा हिरेंचे आयोजन

शाळा- महाविद्यालयातील सहकारी म्हणजे निःस्वार्थ मैत्री. हे मित्र-मैत्रिण विखुरल्यावर अनेक क्षेत्र पादाक्रांत करतात. हे मित्र-मैत्रिणी एकत्र आल्यावर रंगलेल्या गप्पांतील जुन्या सुवर्णस्मृतींचे मोरपीस प्रसन्न करते. हा आनंद मिळविण्यासाठी येथील भाजप आमदार सीमा हिरे यांनी व्हाटस्‌ऍपद्वारे पुढाकार घेतला अन्‌ देशभर विखुरलेल्या शंभर कॉलेजमित्र- मैत्रीणींनाना एकत्र केले. त्यांचा स्नेहमेळावा या सर्वांना एका वेगळ्याच हिंदोळ्यावर घेऊन गेला.
 व्हाॅटसअॅपच्या माध्यमातून शंभर काॅलेज मित्र-मैत्रिणींचे गॅदरिंग - आमदार सीमा हिरेंचे आयोजन

नाशिक : शाळा- महाविद्यालयातील सहकारी म्हणजे निःस्वार्थ मैत्री. हे मित्र-मैत्रिण विखुरल्यावर अनेक क्षेत्र पादाक्रांत करतात. हे मित्र-मैत्रिणी एकत्र आल्यावर रंगलेल्या गप्पांतील जुन्या सुवर्णस्मृतींचे मोरपीस प्रसन्न करते. हा आनंद मिळविण्यासाठी येथील भाजप आमदार सीमा हिरे यांनी व्हाटस्‌ऍपद्वारे पुढाकार घेतला अन्‌ देशभर विखुरलेल्या शंभर कॉलेजमित्र- मैत्रीणींनाना एकत्र केले. त्यांचा स्नेहमेळावा या सर्वांना एका वेगळ्याच हिंदोळ्यावर घेऊन गेला. 

आमदार सीमा हिरे यांनी गोखले शिक्षण संस्थेच्या 'बीवायके' महाविद्यालयात शिक्षण घेतले. 1990 च्या पदवी परिक्षेच्या बॅचच्या मित्र-मैत्रीणींचे 'रियुनियन' करण्याचा सीमा हिरे यांनी निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी काही मित्र-मैत्रीणींना एकत्र केले. व्हाटस्‌ऍप ग्रुप स्थापन केला. सोशल मिडीयाद्वारे कनेक्‍ट होत त्यांना मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर, बेंगळुरूसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील 130 मित्र-मैत्रीणी सापडल्या. शनिवारी त्यांनी त्यांचा स्नेहमेळावा घेतला. त्यात यातील शंभर जणांनी एकत्र येऊन त्यांनी चांगलीच धम्माल केली. 

सत्तावीस वर्षांनी हे सर्व एकत्र आले. त्यात भाजपचे पदाधिकारी सचिन कुलकर्णी, विक्रीकर सहआयुक्त मनोज आहेर, जनलक्ष्मी बॅंकेचे संचालक शरद गांगुर्डे, लायन्स क्‍लबचे सचिन शहा, पुणे रोटरी क्‍लबच्या पिनल शिरूरकर- वानखेडे, मनीषा पोद्दार, सुनीता देवरे, रोहिणी बलकवडे, नीलिमा करंदीकर, कल्याण देशपांडे, सुधीर पाटील, जितू वाजपेयी, संतोष अक्कर यांसह व्यावसायिक, अधिकारी मेळाव्यात सहभागी झाले होते. जुन्या आठवणी, गाणी, नाटकातील स्वगत, विविध कलांचे सादरीकरण केले. यावेळी एकमेकांना मदत, अडीअडचणींत एकत्र येण्याचा संकल्प केला. अखेर पुढील वर्षी पुणे येथे भेटण्याचा संकल्प करुन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com