mla satish patil attack by unknown | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या वाहनावर अज्ञाताकडून हल्ला 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या भरधाव वाहनावर हेल्मेट घातलेल्या डबलसिट असलेल्या मोटारसायकलस्वारांनी हल्ला केला,यात त्यांच्या वाहनांची चालकाच्या बाजुच्या खिडकीची काच फुटली. 

चालकांने वाहनावर ताबा राखल्याने सुदैवाने मोठ्या अपघात होण्यापासून बचावले. ही घटना जळगाव येथील शिवकॉलनी रेल्वे पुलाजवळ घडली. या प्रकरणी अज्ञाताविरूध्द पारोळा पोलीसात गुन्हाही दाखल करण्यात आला असून तो जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. 

आमदार सतीश पाटील, त्यांचे स्वीय सहाय्यक मूंकूदा माने व अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कोकणी पारोळ्याहून फॉरच्युनर गाडी (क्रमांक एम.एच.15 इक्‍स 9009)ने पारोळ्याहून जळगावकडे येत होते. जळगाव येथील शिवकॉलनी जवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळील मानराज पार्क समोरून मोटरसायकलवर दोन अज्ञात युवक येत होते. मोटरसायकल चालकाने हेल्मेट परिधान केले होते. त्याने आपला उजवा हात बाहेर काढला होता. 

चालकांने त्याला वाचविण्यासाठी डाव्या बाजूला घेतली परंतु या मोटरसायकलस्वाराने जोरदार फटका मारला यात ड्रायव्हर बाजूकडील खिडकीचा काच फुटला. चालक घाबरला गाडी नियंत्रित करून पुढे जावून थांबविली. परंतु ते दोघे मोटरसायकलस्वार वेगाने निघून गेले. सुदैवाने गाडी रस्त्याच्या खाली उतरली नाही अन्यथा मोठा अपघात झाला असतो. याबाबत चालक गुलाब नामदेव पाटील यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पूर्वनियोजित हल्ल्याचा कट : पाटील 
आमदार डॉ.सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, देवाची कृपा असल्यानेच आपण बचावलो, हा पूर्वनियोजित हल्ल्याचा कट असल्याचे आपल्यास वाटत आहे.त्याने लक्ष ठेवूनच हल्ला केला असावा.गाडीच्या काचेवर हल्ला करून चालकाला घाबरवून त्यांचे वाहनावर नियंत्रण अपघात घडविण्याचाही त्याचा प्रयत्न असावा, याबाबत पोलीसात तक्रार दाखल केली आहे, पोलीस अधिक्षकांशीही आपण चर्चा केली आहे.  

संबंधित लेख