MLA Satish Chavan , Subhash Zambad Dhanajay Munde | Sarkarnama

औरंगाबादच्या कचऱ्यावरून सतीश चव्हाण , सुभाष झांबड ,मुंडेंनी सरकारला धारेवर धरले

प्रशांत बारसिंग :  सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 मार्च 2018

औरंगाबादचा कचरा प्रश्न विधानपरीषदेत गाजला. आमदार सतीश चव्हाण ,आमदार  सुभाष झांबड आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी सरकारला धारेवर धरले.

मुंबई  :  औरंगाबादचा कचरा प्रश्न विधानपरीषदेत गाजला. आमदार सतीश चव्हाण ,आमदार  सुभाष झांबड आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी सरकारला धारेवर धरले.

गेले वीस  दिवस औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला असून त्याचे पर्यवसन काल दंगलीमध्ये झाले. त्या घटनेवर आज विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम 289 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडताना महानगरपालिका बरखास्त करावी .सेना-भाजपच्या भांडणामध्ये औरंगाबादची वाट लागली असून याठिकाणी प्रशासक नेमा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.  

औरंगाबादेत वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती  असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिश चव्हाण यांनी सभागृहाला सांगितले . कॉंग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांनीही याविषयाला  सत्ताधारी शिवसेना भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला.यावेळी कचरा विल्हेवाटीसाठी निविदा न काढता आठ दिवसात मशिनरी खरेदी करण्यात येणार असून हा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्‍वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले.

औरंगाबादमध्ये पेटलेल्या कचरा प्रश्नावर आमदार सतिश चव्हाण  आक्रमक झाले. त्यांनी औरंगाबादमध्ये वैदयकीय आणीबाणी आली असल्याचे सांगतानाच पोलिसांनीच दंगलीमध्ये वाहने फोडल्याचा गंभीर आरोपही केला. याशिवाय  या कचरा प्रश्नामुळे औरंगाबादकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही एक प्रकारची आणीबाणी निर्माण झाली आहे, परिस्थिती गंभीर असल्याचेही चव्हाण म्हणाले .

गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेचा कचरा नारेगाव येथे टाकण्यावरून आंदोलन चालू आहे. काल या आंदोलनाला हिसंक वळण लागून पोलिसांनी गोळीबार केला. या राज्यात आता कोणीही आंदोलन केले तरी सरकार त्यांच्यावर गोळीबार करणार आहे ?शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्यांच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला . 

सुभाष झांबड म्हणले ," मुख्यमंत्र्यांनी  नारेगाव ऐवजी खदानीमध्ये कचरा टाकण्यासाठी सांगितले आहे. पण खदाणीसाठी ज्या मार्गावरून जावे लागते, त्या मार्गालगतच्या गावांनीही कचऱ्याचा एकही ट्रक जावू देणार नसल्याचे सांगितले आहे."

 मुंडे आणि इतर आमदारांनी या गंभीर प्रश्नांवर सभागृहात चर्चा करण्यासाठी अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उत्तर दिले व यावर उद्या चर्चा करण्याचे मान्य केले.
.

संबंधित लेख