mla sangram jagtap issue notice by police | Sarkarnama

आमदार जगताप पिता-पुत्र हद्दपारीच्या नोटिसांच्या रडारावर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

नगर: महापालिकेची निवडणूक निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने हद्दपारीच्या नोटीसा देवून त्याबाबत सुनावणी सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसांत निकाल लागून निवडणुकीच्या काळात कोण हद्दपार होणार, ते निश्चित होईल, मात्र अजूनही काहींना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे.

दोघा आमदार पितापुत्रांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस ठाण्यात तयार करण्यात आल्याचे समजते. हद्दपारीच्या नोटीसा दिलेल्यांची संख्या आता ४८१ झाली आहे. यापूर्वी ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. ज्यांनी राडा घालून समाजात तेढ निर्माण केले आहे, आंदोलने करून जनतेला वेठीस धरले आहे, अशा व्यक्तिंचा नोटिसांमध्ये समावेश आहे. सुनावणीनंतर यातील काही लोकांची हद्दपारीतून सुटका होऊ शकते, मात्र बहुतेकजण जिल्हाबाहेर राहण्याची शक्यता आहे. सुनावणीनंतर हद्दपार झालेले मंगळवारपासून (ता. २०) निवडणूक होईपर्यंत जिल्हाबाहेर राहणार आहेत.

केडगाव हत्याकांड प्रकरणात आमदार जगताप पिता-पुत्रावर जिल्हा अधीक्षक कार्यालयात राडा घातल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. त्याबाबत निकालही लागला आहे. असे असले, तरी महापालिका निवडणूक निर्भय वातावरणात होण्यासाठी पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून अशा नोटीसा देण्यात येणार आहेत.
 
संबंधित लेख