mla sangram jagtap about party stand | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

भाजपला पाठिंबा देवू नका, असा निरोप राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी दिलाच नाही!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 डिसेंबर 2018

सध्या केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. किमान त्यानिमित्ताने शहराला ३०० कोटी मिळून शहराचा विकास होईल.

- संग्राम जगताप, आमदार  

नगर : महापालिका निवडणुकीनंतर महापौर - उपमहापौर निवडीदरम्यान भाजपला पाठिंबा देऊ नका, असा कोणताही निरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेला नव्हता. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. भाजपने शहरासाठी ३०० कोटी देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत भाग घेणार नाहीत. शहराच्या विकासासाठीच भाजपला बाहेरून पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुर्वीपासून शहराचे कायम हित पाहिले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आमचे संख्याबळ १९ झाले होते. तथापि, महापौर आमचा होऊ शकत होता. परंतु भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ३०० कोटी शहराला मिळाले तर शहराचा विकास होईल. त्यातील शंभर कोटी ते पहिल्या टप्प्यात देतील, असे आश्वासन देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आहे. कोणतेही पद न घेता आम्ही केवळ त्यांच्यावर अंकुश ठेवणार आहोत. भाजपची सत्ता ही शहराच्या फायद्याचीच राहिल. लोकांच्या हितासाठीच हा माझा निर्णय आहे. त्यामध्ये वडील आमदार अरुण जगताप यांचाही काहीही संबंध नाही. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी युती कोणाशी करावी, याबाबत चर्चा केलेली नव्हती. मी स्वतः हा निर्णय घेतला असल्याचे जगताप यांनी सांगितले.

 शिवसेनेने यापूर्वी सत्तेत असताना कोणतेही कामे केले नाही. शिवसेनेचा महापौर केला असता, तर पुन्हा तेच दिवस आले असते. शिवसेनेने कोणतेही विकासकामे केली नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देणे योग्य वाटत नाही. आम्ही भाजपला पाठिंबा दिला नसता, तर शिवसेनेने पुन्हा पाच वर्षे काहीच केले नसते. सध्या केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. किमान त्यानिमित्ताने शहराला ३०० कोटी मिळून शहराचा विकास होईल, याच भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे. पक्षाने नगरसेवकांना दिलेल्या नोटीसांना योग्य ते उत्तर दिले जाईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

संबंधित लेख