हो, सूरतच्या भाजप आमदारच परीक्षा देत होत्या; शिवसेना पडली तोंडावर! 

केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांनी सांगितले, की सहकार्यानंतर परीक्षा खोलीत पाहणीनंतर मूळ परीक्षार्थीच उपस्थित असल्याबाबत तक्रारकर्त्याचे समाधान झाले. त्यांनी "डमी' परीक्षार्थीबाबत गैरसमज दूर झाल्याचे लेखी पत्र दिले. आमच्या केंद्रात महिला आमदार परीक्षार्थी आहेत हे कुणालाही ठाऊक नव्हते. ते आज समजले. सोनगीरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे म्हणाले, की केंद्रात तपासणीवेळी माझ्यासह पोलिस कर्मचारी, इतर काही स्टाफ, शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे "डमी' उमेदवाराऐवजी पुन्हा आमदारांना परीक्षा खोलीत बसविणे, असे होणे शक्‍य नाही. तशी तक्रार झाली तर तथ्यहीन असेल. केंद्रात "सीसीटीव्ही'ची सुविधा आहे.
हो, सूरतच्या भाजप आमदारच परीक्षा देत होत्या; शिवसेना पडली तोंडावर! 

धुळे : सुरतमधील लिंबायत मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार संगीताबेन पाटील या नव्हे तर "डमी' उमेदवार सोनगीर (ता. जि. धुळे) येथील केंद्रात परीक्षा देत असल्याची माहिती सुरतमधीलच शिवसेनेचे शहरप्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ते परीक्षा केंद्रात दाखल झाले. मात्र, तासाभरातील वाद, लेखी तक्रारी, कुलगुरू, पोलिसांचा हस्तक्षेप, चौकशीअंती शिवसेनेचे तक्रारकर्ते पाटील यांचा पाठलाग निष्फळ ठरल्याचे चित्र समोर आले. या नाट्याची चर्चा नंतर सोशल मीडियासह जिल्ह्यापाठोपाठ सुरतमध्येही रंगली. 

गेल्या वर्षी संगीताबेन राजेंद्रभाई पाटील या लिंबायत मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांचे सासर करवंद (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील आहे. त्यांचे शिक्षण नववी किंवा दहावीपर्यंत असल्याचे सांगितले जाते. त्यांनी मुक्त विद्यापीठामार्फत "बीए' होण्याचा ध्यास घेतला. या शाखेच्या अंतिम तिसऱ्या वर्षाचा राज्यशास्त्र विषयाचा पेपर देण्यासाठी त्या शुक्रवारी परीक्षा केंद्रात उपस्थित होत्या. 

या केंद्रात दुपारी बाराला सुरतमधील शिवसेनेचे शहराध्यक्ष विलास पाटील कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यांनी परीक्षा केंद्रप्रमुखांकडे आमदार पाटील यांच्याऐवजी "डमी' उमेदवार परीक्षा देत असल्याची तक्रार केली. त्यावर केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांनी तक्रारकर्त्याकडे लेखी तक्रार मागितली आणि तपासणीसाठी पोलिसांची लेखी संमती द्यावी, असे सुचविले. हा वाद विद्यापीठापर्यंत पोहोचल्यानंतर कुलगुरूंची सूचना आणि सोनगीरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे यांच्या सहकार्याने तक्रारकर्ते विलास पाटील हे चौथ्या मजल्यावरील परीक्षा खोलीत पोहोचले. तेथे परीक्षार्थी आमदार संगीता पाटील आहेत की "डमी' उमेदवार याविषयी शहानिशा केली. महिला व पुरुष पोलिस, प्राचार्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. आमदार पाटील याच उत्तरपत्रिका लिहीत असल्याचे स्पष्ट झाल्यावर तक्रारकर्त्याकडून प्राचार्यांनी तसे लेखी पत्रही घेतले. तासाभराने या नाट्यावर पडदा पडला. 

शिवसेनेचे तक्रारकर्ते विलास पाटील हे राजकीय द्वेषातून माझ्या बदनामीचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरोधात बदनामीचा दावा दाखल करू, असे आमदार संगीता पाटील यांनी सांगितले. तक्रारकर्ते विलास पाटील म्हणाले, की नवापूर, विसरवाडी आदी केंद्र सोडून सोनगीर येथील केंद्रावरच आमदार परीक्षार्थी का झाल्यात? केंद्रप्रमुखांनी परीक्षा खोलीची तपासणी करू देण्यास नकार दिल्यावर पोलिस, कुलगुरूंशी चर्चा करण्याच्या वेळात संगनमताने "डमी' उमेदवार बदलून आमदार पाटील यांना बसविण्यात आले. पूर्वीचे पेपर व आजचे आमदारांचे हस्ताक्षर तपासण्याची मागणी विद्यापीठाकडे करू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com