mla sangeeta thombre`s demand creates havoc in latur | Sarkarnama

आमदार संगिता ठोंबरेंनी लातूरच्या तोंडचे पाणी पळविले

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

पुणे : मराठवाड्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, त्याचा फटका देखील बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. केजच्या आमदार संगिता ठोंबरे यांनी लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी ती तातडीने मान्य केली. परिणामी शेकडो कारखाने बंद होणार आहेत.

मांजरा धरणावर लातूर, केज आणि अंबेजोगाई या तीन शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. धरणात अत्यल्प साठा असल्याने आतापासूनच पाणीकपात सुरू झाली आहे. केज आणि अंबोजोगाई तालुक्यांत अत्यल्प पाऊस झाल्याने येथेही पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. या दोन्ही ठिकाणी पाणी मिळविण्यासाठी लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा थांबविणे गरजेचे होते. त्यानुसार त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ठोंबरे यांनी मागणी केली होती.

त्यांच्या मागणीनंतर एमआयडीसीचा पाणीपुरवठा आजपासूनच थांबविण्यात आला. त्यामुळे कारखाने बंद पडून कामगारांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याचा धोका व्यक्त होत आहे. ठोंबरे यांच्याविरोधात साहजिकच संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे ठोंबरे यांच्या मतदारसंघासाठी मात्र पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

संबंधित लेख