mla sanap pay fine to nashik corporation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

तुकाराम मुंढेंवर 'अविश्‍वास' आणणारे आमदार सानप आठवड्याभरातच आले शरण

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

तुकाराम मुंढे राजकीय नेते, आमदारांना न जुमानता सुधारणांची गाडी रेटत आहेत.

नाशिक : भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणला होता. नेत्यांच्या राजकीय जखमेवर मलम लावण्यासाठी त्यांनी हे डावपेच आखले होते. मात्र आयुक्त मुंढे त्याला बधले नाहीत. आमदार सानप यांनाच नऊ लाख रुपये दंडाची नोटीस दिली होती. आज आमदार सानप यांनी दंडाची रक्कम जमा करीत निमुटपणे तुकाराम मुंढेंपुढे शरणागती पत्करली. 

आयुक्त तुकाराम मुंढे राजकीय नेते, आमदारांना न जुमानता सुधारणांची गाडी रेटत आहेत. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप दुखावले होते. त्यांनी महापौर रंजना भानसी यांच्यामार्फत आयुक्त मुंढेंवर अविश्‍वास प्रस्ताव आणला होता. त्यात थेट मुख्यमंत्री कार्यालयाने हस्तक्षेप केला. हा प्रस्ताव बारगळला. मात्र त्याने आयुक्त मुंढे यांनी माघार घेतली नाही. गत नऊ वर्षांपासून महापालिकेची मोठी इमारत आमदार सानप यांनी नियमबाह्यपणे आपल्या ताब्यात ठेवली होती.

कराराशिवाय नियमबाह्य कब्जा केल्यावर त्यासाठी त्यांनी एक पैसाही भाडे महापालिकेला दिले नव्हते. त्याबाबत दंडासह नऊ लाखांची रक्कम जमा करण्याची नोटीस प्रशासनाने दिली. आज आमदार सानप यांनी ही रक्कम महापालिकेली अदा केली. त्यामुळे प्रारंभी नोटीस चुकीची असल्याचा दावा करणारे आमदार सानप यांना आठवड्याभरातच दुसऱ्यांदा मुंढे यांच्यापुढे शरणागती पत्करावी लागली. त्याने अन्य राजकीय नेतेही आयुक्त मुंढेंच्या कार्यशैलीने चांगलेच धास्तावले आहेत. 

संबंधित लेख