MLA Sadanand Chavan says My best wishes for Uday Samant | Sarkarnama

आमदार सदानंद चव्हाण  म्हणतात, उदय सामंतांना माझ्या शुभेच्छा !

मुझफ्फर खान
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

पक्षाने संधी दिली नाही म्हणून राग नाही. सामंत यांना शुभेच्छा आहेत.

-आमदार सदानंद चव्हाण

चिपळूण :  रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना म्हाडाचे अध्यक्षपद अध्यक्षपद मिळाले म्हणून मी अजिबात नाराज नाही. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार सदानंद चव्हाण यांनी व्यक्त केली. 

राज्य सरकारने महामंडळ पदाधिकार्‍यांची नियुक्ती केली. ज्यांना मंत्रीमंडळात सामावून घेता आले नाही किंवा ज्यांची सेनेप्रती निष्ठा असल्यानेच जे शांत राहीले आणि सैनिक म्हणून ज्यांनी हा निर्णय मान्य करीत आज ना उद्या संधी मिळेल, असे आपल्या मनाला समजावले, त्यांची यावेळीही सेनेच्या नेतृत्त्वाकडून घोर निराशा झाल्याची चर्चा शिवसैनिकांमध्येच रंगली आहे.

 या पार्श्‍वभूमीवर आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले,  दुसर्‍याला मिळू नये या मताचा मी अजिबात नाही. मंत्रीपद किंवा महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे यासाठी मीही प्रयत्न करत होतो. पक्षाने संधी दिली नाही म्हणून राग नाही. सामंत यांना शुभेच्छा आहेत. सेना-भाजप युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित लेख