MLA Requests CM to Sanction 100 Cr for Chaknapur Canal | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

आमदार राहुल आहेर यांची चणकापूर कालव्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे 100 कोटींची मागणी!

संपत देवगिरे 
रविवार, 2 डिसेंबर 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अटल महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने दौऱ्यावर आले होते. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आपल्या मतदारसंघातील कामांसाठी या दौऱ्याचा चांगलाच लाभ करुन घेतला. व्यासपीठावर आमदार आहेर यांनी सध्या गाजत असलेल्या चणकापुर कालव्याच्या विस्तारीकरणाच्या शंभर कोटींची फाईल मंजूर करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी तो विषय समजावून घेतला. 

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अटल महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने दौऱ्यावर आले होते. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आपल्या मतदारसंघातील कामांसाठी या दौऱ्याचा चांगलाच लाभ करुन घेतला. व्यासपीठावर आमदार आहेर यांनी सध्या गाजत असलेल्या चणकापुर कालव्याच्या विस्तारीकरणाच्या शंभर कोटींची फाईल मंजूर करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी तो विषय समजावून घेतला. 

कळवण, देवळा, मालेगाव या तीन तालुक्‍यांसाठी चणकापुर कालव्याचा विषय महत्वाचा आहे. त्यासाठी तापी खोरे विकास माहमंडळामार्फत आमदार राहुल आहेर यांनी चणकापुर कालव्याचे विस्तारीकरण व दुरुस्तीचा प्रस्ताव दिला आहे. त्यात चणकापूर धरणापासुन सुरु होणारा उजवा कालवा विस्तारीत करावा. चणकापुर ते रामेश्‍वर धरण आणि त्यापुढे मालेगावलगतचा परिसराला लाभ होण्यासाठी उमराणे भागातील परसुल लघुपाटबंधारे प्रकल्पापर्यंत त्याचा विस्तार करावा असा प्रस्ताव आहे. त्याची फाईल सध्या मंत्रालय स्तरावर आहे. हा विषय आमदार आहेर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकला. दुष्काळ निवारणासाठी तो महत्वाचा विषय आहे. त्याला मंजुरी दिल्या त्याचा परिसराला लाभ होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो बारकाईने समजावून घेतल्याचे सांगण्यात आले. त्या दृष्टीने हा दौरा स्थानिक लोकप्रतिनिधींना फलदायी ठरला आहे. 

संबंधित लेख