MLA Ravi Rana supplies free grocery to thousand families on Diwali | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

आमदार रवी राणांचा फंडा : दरवर्षी एक हजार कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा

सुरेंद्र चापोरकर 
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

दिवाळी आल्यानंतर 'आमदार रवि राणा, गरीबांना देतात किराणा' अशी घोषणा या परिसरात परिचित झाली आहे. 

अमरावती  : निवडणुका जवळ आलेल्या असताना   आमदार रवी राणा  आणि नवनीत कौर राणा यांनी  एक  हजार कुटुंबांना दिवाळीच्या किराणाचे वाटप केले आहे .  प्रत्येक दिवाळीला निवडणूक नसते पण आपण दरवर्षी दिवाळीला गरीब कुटुंबाना किराणा वाटप करतो असे आमदार रवी राणा म्हणतात . 

दरवर्षीप्रमाणे यंदाही रवी राणा व नवनीत राणा गोरगरीब नागरिकांची दिवाळी साजरी होण्याकरिता किराणाचे वाटप करीत आहेत. दरवर्षी दिवाळी आल्यानंतर रवि राणा एक हजार गरीबांना मोफत किराणा देतात व त्यांची दिवाळी चांगली करण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबवितात. त्यामुळे दिवाळी आल्यानंतर 'आमदार रवि राणा, गरीबांना देतात किराणा' अशी घोषणा या परिसरात परिचित झाली आहे. 

त्यामध्ये साखर, मुरमुरे, पोहा, मैदा, रवा, मसाला, मिरची पावडर, शेंगदाणे, डाळ, डालडा आदींचा समावेश असतो. किराणा भरलेल्या पिशव्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.

शिक्षक, डॉक्‍टर, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते अशी चारशे लोकांची चमू स्वयंसेवकांची भूमिका पार पाडत आहे. राणा दाम्पत्यांची दिवाळी भेट ही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जरी असली तरी ती गरिबांना भावणारी आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळी आली की, बडनेरा मतदारसंघातील गरीबांना आमदार रवि राणा यांची आठवण येते. 

या संदर्भात 'सरकारनामा'शी बोलताना आमदार रवि राणा म्हणाले, " दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण आहे. हा सण प्रत्येक घरात आनंदाने साजरा व्हावा, असे वाटते परंतु गरीबीमुळे अनेकांना आपल्या घरात गोडधोडही करता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन आपण गरीबांना किराणा पुरविण्याचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवित आहे. यात निवडणुकीचा कोणताही उद्देश नसतो. प्रत्येक वर्षी निवडणूक  येत नाही. तरी प्रत्येक वर्षी हा उपक्रम आपण राबवितो."

संबंधित लेख