MLA Ravi Rana & Navneet Rana pray for welfare of poor people | Sarkarnama

आमदार रवी आणि नवनीत राणा यांनी देवाला काय मागितले ? 

सुरेंद्र चापोरकर
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

" लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सायंकाळी  त्यांनी  पूजा केली. चकल्या, करंज्या, पुरणपोळी ही सर्व पक्वाने मला करता  येतात. वेळ मिळाला तर मी ते करते सुद्धा.  दिवाळीच्या दिवशी काही तास कुटूंबातील सदस्यांसोबत घालवते," असे नवनीत राणा यांनी  सांगितले.

अमरावती: निवडणुका जवळ आल्या आहेत . बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार असलेले रवी राणा पुन्हा तयारीला लागले आहेत . तर गेल्यावेळी मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढताना नवनीत कौर राणा यांना पराभव पत्करावा लागला होता . त्यामुळे या दिवाळीला राणा दाम्पत्याने देवाकडे काय राजकारणात मोठे यश मागितले असेल असा सर्वांचा कयास असेल . 

पण प्रसिद्ध अभिनेत्री नवनीता राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी ' सरकारनामाशी बोलताना सांगितले ," बडनेरासह अमरावती जिल्ह्यातील गोरगरीबांच्या घरी समृद्धीचे दिवे उजळू दे, अशी मागणी आम्ही  लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने केली."

बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांचे जिल्ह्यातील राजकारणात एक वेगळे स्थान आहे. योगगुरू बाबा रामदेव यांचे अत्यंत विश्‍वासू असलेल्या रवी राणा गेल्या दहा वर्षांपासून बडनेरा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा या सुद्धा समाजजीवनात एकरूप झाल्या आहेत . नवनीत कौर राणा यांनी गेल्यावेळी लोकसभा निवडणूकही लढविलेली आहे . 

प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या नवनीत राणा यांनी समाजातील गरीबातील गरीब व्यक्तीच्या कल्याणासाठी मदत करण्याचे संकल्प केला आहे. या संकल्पातून मतदारसंघातील 50 हजार कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा देण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 

अमरावती येथील घरी राणा दाम्पत्याने लक्ष्मीपूजन केले. यानिमित्ताने सरकारनामाशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या," लक्ष्मीपूजन धडाक्‍यात करण्यात आले. यावेळी वैभवाची देवता असलेल्या लक्ष्मीकडे समाजातील गरीबी कमी व्हावी व त्यांच्या जीवनात समृद्धीची दिवा उजळावा, अशी कामना आम्ही केली आहे. "

 

 

संबंधित लेख