MLA Randhir Savarkar Hits Sixer | Sarkarnama

आमदार रणधीर सावरकरांनी मारली सिक्सर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

विधानसभेत शब्दांनी राजकीय पीच वर धुव्वाधार फटकेबाजी करणारे भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी करीत क्रीडा रसिकांची मने जिंकली. यावेळी अामदार सावरकरांनी स्पर्धेचे उद्घाटन करताना पहिल्याच बॉलवर सिक्सर मारल्याने उपस्थित क्रीडा रसिकांमध्ये उत्साह संचारला. 

अकाेला : विधानसभेत शब्दांनी राजकीय पीच वर धुव्वाधार फटकेबाजी करणारे भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी करीत क्रीडा रसिकांची मने जिंकली. यावेळी अामदार सावरकरांनी स्पर्धेचे उद्घाटन करताना पहिल्याच बॉलवर सिक्सर मारल्याने उपस्थित क्रीडा रसिकांमध्ये उत्साह संचारला. 

जिल्ह्याच्या राजकारणात अभ्यासू आमदार म्हणुन रणधीर सावरकर यांचा नावलाैकीक अाहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, मजुर, कामगारांच्या प्रश्नावर शासन अाणि प्रशासनाला धारेवर धरत अामदार सावरकर सातत्याने जनसामान्यांचे लक्ष वेधत अाहेत. विधानसभेत जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नांवर धुव्वाधार शाब्दिक फटकेबाजी करणारे अामदार सावरकर यांनी अकाेला पुर्व विधानसभा मतदारसंघातंर्गत दादासाहेब दिवेकर शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर अायाेजित सीएम चषक स्पर्धेतही जाेरदार फटकेबाजी केली. 

या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास महापाैर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थाेरात, महानगराध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण माेरखडे, महापालिका स्थायी समिती सभापती विशाल इंगळे, नगरसेवक अजय शर्मा, तुषार भिरड, डॉ. विनाेद बाेर्डे, संजय जिरापुरे, धनंजय गिरधर, डाॅ. किशाेर मालाेकार, सुमनताई गावंडे, गितांजली शेगाेकार, सुनिल क्षीरसागर, गिरीष जाेशी, जयंत मसने, अनिल गावंडे, संताेष शेगाेकार, पल्लवी माेरे, अनिल नावकार, भाजप युवा माेर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप सागळे अादी पदाधिकारी उपस्थित हाेते. यावेळी महापाैर विजय अग्रवाल, किशाेर मांगटे पाटील यांनीही जाेरदार बॅटींग करून मैदान गाजविले. 
 

संबंधित लेख