MLA Randhir Savarkar on Deewali | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या जिवनात समृद्धीचा दिवा उजळू दे : आमदार रणधीर सावरकर

श्रीकांत पाचकवडे:  सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

आमदार रणधीर सावरकर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या पळसो बढे गावी जाऊन  प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करीत आहेत .

अकोला: "जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराज्याच्या जिवनात समृद्धीचा प्रकाश पडावा, त्यांचे जिवन तेजोमय विकास पर्वाने सुरू व्हावे अशी प्रार्थना दिवाळीच्या पावन पर्वावर ईश्वराकडे करीत आहे ," असे  भाजपचे अकोला पुर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले .  

 सर्वसामान्याप्रमाणेच आमदार रणधीर सावरकर हे सुद्धा सर्व राजकीय परिनिवेश बाजुला सारून सध्या दिवाळी उत्सवाच्या तयारीत गुंतले आहेत. ही दिवाळी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या सानिध्यात ते साजरी करीत  आहेत. दरवर्षी कुटूंबासह पळसो बढे गावी जाऊन लक्ष्मीपुजन करीत असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले. दिवाळी उत्सवाची धामधुम असली तरी शेतकरी, मजुर, कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार सावरकर हे मतदारसंघातील दौरे करीत आहेत.

सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून शेतकरी बांधवांनी खचून न जाता स्वतःचे मनोधैर्य वाढविणे आवश्‍यक आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा कंलक पुसण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायाकडे वाढविण्याचा आपला प्रयत्न असल्यचे आमदार सावरकर म्हणाले.

दिवाळीनिमित्त विविध प्रकाराचे फटाके फोडण्यात येतात. मात्र, या फटाक्‍यामुळे प्रदुषण वाढत असून लहान मुलांसोबत अपघात घडण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे दिवाळी उत्सवानिमित्त सर्वसामान्य जनतेमध्ये प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत जनजागृती करणार असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले.

संबंधित लेख