MLA Ramesh Kadam President Election Voting | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मलाही मतदानाची संधी द्या - रमेश कदम यांचीमागणी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 जुलै 2017

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार म्हणून मतदान करण्याचा घटनेने दिलेला अधिकार असून, या अधिकारावर गदा येवू नये अशी बाजू मांडत राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्यावतीने अॅड. तपस्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात कदम यांना मतदानाची संधी मिळावी, असा विनंती अर्ज केला आहे.

मुंबई : अण्णाभाउ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात सध्या कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनीही आपणासही राष्ट्रपती पदासाठी मतदान करण्याची संधी मिळावी, अशी मागणी याचिकेद्धारे मुंबई उच्च न्यायालयात केली असून, याप्रकरणाची सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे. 17 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी दुसऱ्या प्रकरणातील आरोपी आमदार छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयाने दिली आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार म्हणून मतदान करण्याचा घटनेने दिलेला अधिकार असून, या अधिकारावर गदा येवू नये अशी बाजू मांडत राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्यावतीने अॅड. तपस्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात कदम यांना मतदानाची संधी मिळावी, असा विनंती अर्ज केला आहे. त्याचबरोबर 'कारागृहात मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण घडल्याचा प्रकार उघडकीस आला असून कारागृहात असे अनेक गैरप्रकार घडत आहेत. विधीमंडळातील एक सदस्य म्हणून येत्या 24 जुलैपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनामध्ये हे प्रकरण मांडण्याची संधी मिळावी,' असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

आमदार या नात्याने भुजबळ यांना 17 जुलै रोजी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्याची सवलत दिली आहे, त्यामुळे रमेश कदम यांनाही मतदानाची संधी मिळण्याची शक्‍यता अधिक असल्याचे बोलले जाते.

संबंधित लेख