MLA Ramesh Kadam Abuses Police officer | Sarkarnama

पोलिसाला धमकावल्याप्रकरणी चौकशीचे आदेश - आमदार कदम शिवीगाळ प्रकरण (सोबत व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मे 2017

वैद्यकीय तपासणीसाठी कदम याला गुरुवारी भायखळा कारागृहातून जे.जे. रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. त्यावेळी कदम थेट चालत सुटला. पोलिस व्हॅन आली नसल्यामुळे पोलिस अधिकारी पवार याने कदम याला बाजूला उभे राहण्यासाठी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या कदम यांनी पवार यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली, अशी माहिती नागपाडा पोलिस ठाण्यातील एका अधिका-याने दिली. त्यानंतर कदम याने पवार यांना शिवीगाळही केली.

मुंबई - सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांना आमदार रमेश कदम याने धमकावल्याची चित्रफीत वायरल झाल्यानंतर याप्रकरणी नागपाडा पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय महामंडळाच्या निधीतील 132 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी 2015मध्ये रमेश कदमला अटक झाली होती.

वैद्यकीय तपासणीसाठी कदम याला गुरुवारी भायखळा कारागृहातून जे.जे. रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. त्यावेळी कदम थेट चालत सुटला. पोलिस व्हॅन आली नसल्यामुळे पोलिस अधिकारी पवार याने कदम याला बाजूला उभे राहण्यासाठी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या कदम यांनी पवार यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली, अशी माहिती नागपाडा पोलिस ठाण्यातील एका अधिका-याने दिली. त्यानंतर कदम याने पवार यांना शिवीगाळही केली.

या सर्व प्रकाराचे पवार यांनी एका पोलिस शिपायाच्या मदतीने चित्रीकरण करून घेतले. दरम्यान यावेळी कदम यांनी हक्कभंग आणण्याचीही धमकी पवार यांना दिली. तसेच कदमने पवार हे 25 हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार त्यांच्या वरिष्ठांना करण्यास आपल्या सहाय्यकाला सांगितले व रुग्णालयात जाण्यास नकार दिला. पुढे एकच्या सुमारास कदम यांना रुग्णालायात नेण्यात आले. तेथे तपासणी करून कदम यांच्या आजाराबाबत शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याप्रकरणी आम्ही चौकशीला सुरूवात केली असल्याचे उपायुक्त(परिमंडळ-3) अखिलेश सिंग यांनी सांगितले. दरम्यान,याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित लेख