दिव्यांग विशालच्या पायांना दिली आमदार राहूल पाटलांनी ताकद

आहेरवाडी (ता. पूर्णा) येथील दिव्यांग विद्यार्थी विशाल खंदारे याचा एक पाय निकामी झाला होता. आमदार डॉ. राहूल पाटील यांनी त्याच्या उपचाराचा खर्च करुन त्याला कृत्रिम पाय मिळवून दिला. त्यामुळे विशालच्या चेहऱ्यावर पूर्वीचे हास्य फुलले आहे.
दिव्यांग विशालच्या पायांना दिली आमदार राहूल पाटलांनी ताकद

परभणी : निवडणुका जवळ आल्या की नेतेमंडळी मतदारांसाठी जिवाचे रान करतात. परंतू, कोणत्याही निवडणुक नसतांनाही केवळ माणुसकीच्या भावनेतून परभणीच्या आमदारांनी दिव्यांग विशाल खंदारेला नव्या स्वप्नांची वाट दाखविली आहे. कृत्रिम पाय भेट देऊन दिव्यांग विशालच्या पायाला आमदार डॉ. राहूल पाटील यांनी एक प्रकारे ताकतच दिली आहे. त्यामुळे विशाल आणि कुटुंब आनंदात आहे.  

आहेरवाडी (ता. पूर्णा) येथील दिव्यांग विद्यार्थी विशाल खंदारे याचा एक पाय निकामी झाला होता. आमदार डॉ. राहूल पाटील यांनी त्याच्या उपचाराचा खर्च करुन त्याला कृत्रिम पाय मिळवून दिला. त्यामुळे विशालच्या चेहऱ्यावर पूर्वीचे हास्य फुलले आहे. असं म्हणतात ना, ईश्वर हा प्रत्येकाच्या मदतीसाठी कोणाला ना कोणाला आपला दूत म्हणून पाठवत असतो. याचाच प्रत्येय विशाल खंदारेच्या बाबतीत आला. पूर्णा पंचायत समितीचे सदस्य छगनराव मोरे यांच्या पुतणीच्या लग्नास योगायोगाने परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल पाटील हे आले होते. त्यावेळी मोरे यांच्या विनंती वरुन आमदार पाटील हे विशाल खंदारे यास भेटावयास गेले होते. तेथील सर्व परिस्थिती पाहून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विशालला पहिल्याच नजरेत पाहून 'विशाल तु काहीही काळजी करु नकोस,' असा शब्द देत दुसरा कृत्रिम पाय बसविण्याठी मी खर्च करतो असे वचन दिले होते. 

आमदार पाटील यांनी केवळ बोलून दाखविले नाही, तर प्रत्यक्ष कृतीने विशालला कृत्रिम पाय बसविण्यासाठी मदत केली. पंचायत समितीचे सदस्य छगनराव मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे विशाल खंदारे यास कृत्रिम पाय बसविण्यात आला. सध्या विशाल खंदारे हा दोन्ही पायाने चालत आहे. आमदार डॉ. पाटील यांनी दिलेला शब्द पाळून समाजकार्य करुन दाखविल्याची चर्चा परिसरात ऐकावयास मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com