MLA Rahul Aher Helps Rowing Champion Dattu Bhoknal | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

दत्तूच्या आॅलिंपिकच्या 'सोन्या'साठी आमदार आहेरांनी पाडला दुष्काळी चांदवडला औदार्याचा पाऊस!  

संपत देवगिरे 
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

दीपावलीच्या निमित्ताने आमदार डॉ. राहुल आहेर यांचा तालुक्‍यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिकांना एकत्र करुन शुभेच्छांचा कार्यक्रम आज सकाळी शासकीय विश्‍मागृहावर झाला. तालुक्‍याचा सुपुत्र दत्तू भोकनळ याने आशियाई स्पर्धेत रोईंग मध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. सध्या तो 2020 च्या ऑलिंपिक स्पर्धेची तयारी करीत आहे. त्याला आर्थिक मदत करणे हा दीपावली बैठकीचा मुळ हेतू होता.

नाशिक : चांदवडला यंदा भीषण दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याचीही प्रतिक्षा करावी लागते. त्यांच्या या दुःखाने जणु डोळ्यातले अश्रुही आटलेत. मात्र, तालुक्‍यातील रोईंगपटु दत्तू भोकनळला ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळावे यासाठी आमदार डॉ. राहूल आहेर यांनी आवाहन केले अन्‌ होळखरांच्या किल्ल्याच्या पहाडाच्या कातळालाही पाझर फुटावा तसा मदतीचा ओघ सुरु झाला. तासाभरातच आॅलिंपिकच्या 'सोन्या'साठी येथे दिवाळीच्या पुर्वसंध्येला मदतीच्या पैशाचा पाऊस पडला. 

दीपावलीच्या निमित्ताने आमदार डॉ. राहुल आहेर यांचा तालुक्‍यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिकांना एकत्र करुन शुभेच्छांचा कार्यक्रम आज सकाळी शासकीय विश्‍मागृहावर झाला. तालुक्‍याचा सुपुत्र दत्तू भोकनळ याने आशियाई स्पर्धेत रोईंग मध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. सध्या तो 2020 च्या ऑलिंपिक स्पर्धेची तयारी करीत आहे. त्याला आर्थिक मदत करणे हा दीपावली बैठकीचा मुळ हेतू होता. यंदा या तालुक्‍यात प्रचंड दुष्काळ आहे. शेतकरी ऐन पावसाळ्यातच अक्षरशः आकाशाकडे डोळे लावुन बसलाय. 

मात्र दत्तू भोकनळच्या मदतीचा विषय निघाल्यावर दुष्काळाने आटलेल्या कातळालाही पाझर फुटला. डॉ. आहेर यांनी स्वतःचे एक लाखांची मदत जाहिर केली. त्यांच्या आवाहनानंतर माजी आमदार शिरीष कोतवाल, नगराध्यक्ष भुषण कासलीवाल, अशोक व्यवहारे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, रावसाहेब भालेराव, डॉ. नितीन गांगुर्डे या सर्वपक्षीय नेत्यांसह पोलिस निरिक्षक संजय पाटील, विभागीय अधिकारी महेशपाटील, कृषी अधिकारी साळुंखे यांसह सर्व शासकीय संस्थांचे कर्मचारी, ग्रामपंचायत, पतसंस्था, बॅंकांच्या पदाधिकारी मदतीला तयार झाले. अनेकांनी एक दिवसाचे वेतन जाहीर केले. यामध्ये पाहता पाहता सहा लाखांचा निधी जमा झाला. येत्या दोन तीन दिवसांत अन्य संस्था आपला निधी देतील. हा सर्व निधी तहसीलदारांकडे जमा केला जाईल. ते हा निधी भोकनळच्या बॅंक खात्यात जमा करतील. 

2019 साल कुणाचे - जाणून घ्या सरकारनामा दिवाळी अंकातून - सवलतीच्या दरात अॅमेझाॅनवरुन अंक घरपोच मिळवा

संबंधित लेख