mla-r-t-deshmukh-paid-fess-sheetal-jadhav- | Sarkarnama

आमदार आर. टी. देशमुखांनी भरली शीतलची फीस तर आयुक्त रायतेंनी खास बाब म्हणून दिला प्रवेश

दत्ता देशमुख
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

भाजप आमदार आर. टी. देशमुख यांनी खास बाब म्हणून शितल जाधवला वैद्यक शाखेला प्रवेश मिळावा  यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्फत पाठपुरावा केला. सीईटी सेलचे राज्य आयुक्त आनंद रायते यांनी खास बाब म्हणून प्रवेश देण्याच्या सुचना महाविद्यालय प्रशासनाला दिल्या. त्यानुसा बुधवारी शितल जाधवचा दंत वैद्यक शाखेला प्रवेश निश्चित झाला. तिचे दीड  लाखांचे शैक्षणिक शुल्क आमदार आर. टी. देशमुख यांनी भरले. 

बीड : डॉक्टर होऊन आई - वडिलांचे पांग फेडण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या शितल जाधवच्या आयुष्यात आई गेल्याने आणि प्रवेश हुकल्याने अंधार पडला होता. मात्र, आमदार आर. टी. देशमुख यांनी पाठपुरावा केल्यामुळे तिला खास बाब म्हणून मुदतीनंतरही प्रवेश मिळाला . तिचे  प्रथम वर्षाचे  दीड लाखांचे शैक्षणिक शुल्कही आमदार देशमुख यांनी भरले. 

साळींबा (ता. वडवणी) येथील अल्पभूधारक शेतकरी कुटूंबातील शितल जाधवचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. तिच्या स्वप्नपूर्तीसाठी अल्पभूधारक आई - वडिल कबाड कष्ट करत होते. शीतलदेखील मेहनतीने अभ्यास करत होती. मागच्या वर्षी तिला इच्छीत शाखेला प्रवेश मिळाला नाही म्हणून तिने रिपीट केले.

यंदा पूर्व परिक्षेतील गुणांनुसार तिचा दंत वैद्यक प्रवेश यादीत येथील आदित्य दंत महाविद्यालयाच्या यादीत तिचा क्रमांक लागला  होता. इबीसी सवलतीचे निम्मे शुल्क वगळून उर्वरित एक लाख ६२ हजार रुपये भरुन   १८ ऑगस्ट पर्यंत प्रवेश घ्यायचा होता. परंतु, ही तिच्या पालकांना ऐवढी रक्कम जमविता आली नाही. तिने रिटेशन ऑप्शन न भरल्याने तिचे नाव ‘नॉट इलिजीबल’ यादीत आले . म्हणून  तिची या वर्षीची संधीच हुकली होती .

 याच तणावातून तिच्या आईने आत्महत्या केली. आई अशा पद्धतीने अचानक गेल्याने   आणि वैद्यकीय प्रवेश हुकल्याने भविष्यात शीतलला आपले भविष्य अंधःकारमय वाटू लागले होते . परंतु, भाजप आमदार आर. टी. देशमुख यांनी खास बाब म्हणून तिला वैद्यक शाखेला प्रवेश मिळावा  यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्फत पाठपुरावा केला.

सीईटी सेलचे राज्य आयुक्त आनंद रायते यांनी शितल जाधवला खास बाब म्हणून प्रवेश द्या अशा सुचना येथील आदित्य दंत महाविद्यालयास दिल्या. तिच्या शुल्काची एक लाख ६२ हजार ५०० रुपयांची रक्कमही आमदार श्री. देशमुख यांनी अदा केली.

त्यानुसार बुधवारी प्रवेश प्रक्रीया पूर्ण झाली. प्रवेश प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत आमदार देशमुख जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा महाविद्यालयात थांबून राहीले. आमदार देशमुख यांच्यामुळे शितल जाधवच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नास बळ मिळाले. 

संबंधित लेख