रोहयोची कामे का झाली नाहीत? प्रशांत बंब यांनी  अधिकाऱ्यांना  घेतले फैलावर  

बंब यांनी अन्य समितीच्या सदस्यांसह स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना न देता गुरुवारी (ता. 4) सायंकाळी वाडा शहराला भेट देऊन सोनार पाड्याची पाहणी केली.
prashant-bamb
prashant-bamb

वाडा (पालघर ) : आदिवासी पाडे असलेल्या वाडा नगरपंचायत क्षेत्रात रोजगार हमी योजनेचे एकही काम झाले नाही, अशी माहिती नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर यांनी विधिमंडळ समितीला गुरुवारी पालघर येथे झालेल्या आढावा बैठकीत दिली.

त्याची गंभीर दखल घेत समितीचे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी वाडा शहर गाठून आदिवासी पाड्यांची पाहणी केली. त्या ठिकाणी रोहयोची कामे का झाली नाहीत, असा जाब विचारत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

वाडा नगरपंचायत हद्दीत सोनार पाडा, मोहंड्याचा पाडा, कवटे पाडा, अंबिस्ते पाडा, ठाणगे पाडा, नेहरू नगर, कोलेकर पाडा, तळ्याचा पाडा आदी ठिकाणी 40 टक्‍क्‍यांहून अधिक आदिवासी लोकवस्ती आहे; परंतु मागील दोन वर्षांत नगरपंचायत क्षेत्रात रोहयोचे एकही काम झालेले नाही. त्यामुळे जॉब कार्ड असतानाही आदिवासी मजुरांना हक्काच्या रोजगारापासून वंचित राहावे लागले.

 ही माहिती मिळाल्यावर बंब यांनी अन्य समितीच्या सदस्यांसह स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना न देता गुरुवारी (ता. 4) सायंकाळी वाडा शहराला भेट देऊन सोनार पाड्याची पाहणी केली. मजुरांकडे जॉब कार्ड असूनही रोजगार हमीची कामे झालेली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे समितीने अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या वेळी तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे, नगरसेवक संदीप गणोरे, राम भोईर, जागृती काळण, शुभांगी धानवा आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com