mla praniti shinde toll booth issue | Sarkarnama

प्रणिती शिंदेंच्या ओळखपत्राची झेरॉक्‍स चालणार नाही; ओरिजीनलच पाहिजे!

संतोष पवार 
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या ड्रायव्हरने आज सकाळी पुणे- सोलापूर महामार्गावरील वरवडे टोल नाक्‍यावर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. प्रणिती शिंदे या स्वतः गाडीत असताना टोल नाक्‍यावरील कर्मचारी त्यांची गाडी पुढे सोडत नव्हता. त्यामुळे ड्रायव्हरने आमदाराच्या ओळखपत्राची झेरॉक्‍स दाखविली. मात्र झेरॉक्‍स चालत नाही ओरिजनल ओळखपत्र दाखवा, नाही तर गाडी सोडत नाही, असे पवित्रा त्या कर्मचाऱ्याने घेतला. 

सोलापूर : सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या ड्रायव्हरने आज सकाळी पुणे- सोलापूर महामार्गावरील वरवडे टोल नाक्‍यावर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. प्रणिती शिंदे या स्वतः गाडीत असताना टोल नाक्‍यावरील कर्मचारी त्यांची गाडी पुढे सोडत नव्हता. त्यामुळे ड्रायव्हरने आमदाराच्या ओळखपत्राची झेरॉक्‍स दाखविली. मात्र झेरॉक्‍स चालत नाही ओरिजनल ओळखपत्र दाखवा, नाही तर गाडी सोडत नाही, असे पवित्रा त्या कर्मचाऱ्याने घेतला. 

गाडी अडविल्यामुळे ड्रायव्हरचा तोल सुटला आणि येथेच बाचाबाचीला सुरूवात झाली. त्याठिकाणी इतर कर्मचाऱ्यांची गर्दी झाली. त्यानंतर गाडी सोडण्यात आली. या सर्व प्रकारात चिडलेल्या ड्रायव्हरने त्या कर्मचाऱ्याचे ओळखपत्र घेऊन नंतर तो सोलापूरकडे रवाना झाला. पुढे गेल्यावर सावळेश्वर येथील टोल नाक्‍यावर त्याने कर्मचाऱ्याचे घेतलेले ओळखपत्र परत केले. हा सर्व प्रकार आज दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी घडला. 

आमदार प्रणिती शिंदे या मुंबईवरून सोलापूरला येण्यासाठी रेल्वेचाच वापर जास्त करतात. मात्र काल रात्री रेल्वेचे वेळापत्रक कोसळले होते. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रणिती शिंदे यांनी ऐनवेळी मिळालेली दुसरी गाडी घेऊन सोलापूरच्या दिशेने प्रयाण केले होते. सोलापूरला बाय रोड येत असताना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या वरवडे टोल नाक्‍यावर वरील सगळा प्रकार घडला आहे. 

सकाळी टोल नाक्‍यावर झालेला बाचाबाची प्रकार टोल नाक्‍याच्या वरिष्ठ प्रशासनापर्यंत गेला आणि त्यानंतर धावपळ सुरू झाली. या सगळ्या प्रकारानंतर टोल नाका प्रशासनातील अधिकारी हे व्हीआयपी पास घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांना देण्यासाठी त्यांच्या घराकडे गेले. 

संबंधित लेख