mla prakash aabitkar about mscit certificate | Sarkarnama

MSCIT प्रमाणपत्र सादर न केलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

याबाबतचा प्रश्‍न आमदार आबीटकर यांनी सातत्याने लावून धरला होता. 

कोल्हापूर : एमएससीआयटी किंवा समतुल्य संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर न केलेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या वसुलीस राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र सादर न केलेल्या र्मचाऱ्यांच्या वसुलीस स्थगिती देणारे पत्र माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे सुपूर्द केले. याबाबतचा प्रश्‍न आमदार आबीटकर यांनी सातत्याने लावून धरला होता. 

राज्यातील गट- अ, ब, व क संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एमएससीआयटी किंवा समतुल्य संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केलेले नाही, अशा सर्व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणे/ पदोन्नती रोखणे अशी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत एमएससीआयटी परीक्षेत सुट मिळावी याकरिता आमदार आबिटकर यांनी विधानसभेत मागणी केली होती. यासाठी गेली 2 वर्षे पाठपुरावा करत होतो. या पाठपुराव्याला यश आले असून असे प्रमाणपत्र सादर न केलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले. 

राज्यातील सर्वच विभागातील ज्या कर्माच्याऱ्यांनी एमएससीआयटी किंवा संगणक अहर्ता प्रमाणपत्र सादर केलेले नाही अशा कर्मचाऱ्यांचा पदोन्नती रोखणे, वसुली सुरू केली होती. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते. यामध्ये प्रामुख्याने ग्रामविकास विभागांतर्गत प्राथमिक शिक्षक, आरोग्यसेवक, बांधकाम विभाग, महसूल, सार्वजनिक आरोग्य यासह अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू होती. या कारवाईस आता पूर्णविराम मिळणार आहे.

संबंधित लेख