MLA Pharande Nashik News | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आमदार फरांदेंचा सल्ला...कच-यावर उपाय : म्हसोबा बसवा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

सगळीकडे सध्या स्वच्छता मोहिमेचा बोलबोला आहे. येथील जुने नाशिक भागात झालेल्या मोहिमेत आमदार फरांदे यांनी कमरेला पदर खोचत झाडु हातात घेतला. यावेळी एका ठिकाणी वर्षभर कचरा असल्याची तक्रार आली. दोन गट एकमेकांवर दोषारोपण करु लागल्यावर कचरा नको असेल तर येथे म्हसोबा बसवा असा सल्ला आमदारांनी दिल्याने सगळेच अचंबीत झाले.   

नाशिक : सगळीकडे सध्या स्वच्छता मोहिमेचा बोलबोला आहे. येथील जुने नाशिक भागात झालेल्या मोहिमेत आमदार फरांदे यांनी कमरेला पदर खोचत झाडु हातात घेतला. यावेळी एका ठिकाणी वर्षभर कचरा असल्याची तक्रार आली. दोन गट एकमेकांवर दोषारोपण करु लागल्यावर कचरा नको असेल तर येथे म्हसोबा बसवा असा सल्ला आमदारांनी दिल्याने सगळेच अचंबीत झाले.   

जुने नाशिक भागातील कथडा परिसरातील महापालिकेच्या सुमन नाईक शाळा परिसरात नजीकच्या महिला मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरते. याबाबत रहिवासीयांनी तक्रारी केल्या. दोन गट एकमेकांवर दोषारोपण करु लागले. महापालिका अधिका-यांनी रहिवासीयांवर त्याचे खापर फोडले. हा वाद मिटविण्यासाठी येथे म्हसोबा अथवा अन्य काही बसवा म्हणजे प्रश्न सुटेल असे आमदारांनी सांगितले.

आमदार फरांदे यांच्या उपस्थीत येथील विविध भागात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. अधिका-यांच्या पुढे पुढे करीत मिरवणारी एक महिला सगळ्यांच्याच नजरेत भरत होती. चौकशी केल्यावर ती महापालिकेची कर्मचारीच नव्हती. ती अन्य नियमित कर्मचा-याच्या बदल्यात काम करीत असल्याचे निर्दशनास आले. आमदारांनी तिच्या चौकशीच्या सूचनाही केल्या. त्यामुळे कोम सोडून पुढे पुढे करणे त्या महिलेच्या चांगलेट अंगलट आले.  

येथील महापालिका जलकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉलच्या खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने परिसरात डास, मच्छरचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने येथील कर्मचाऱ्यांची त्वरीत बदली करत येथे अन्य कर्मचारी नियुक्तीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आरोग्या सभापती सतीश कुलकर्णी, पूर्वप्रभाग सभापती शाहिन मिर्झा, नगरसेवीका समिना मेमन, शोभा साबळे आरोग्य अधिकारी सुनील बुकाणे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, उपअभियंता जितेंद्र पाटोळे यांच्या अन्य अधिकारी कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले.  

 

संबंधित लेख