आमदार पाचर्णें व प्रदीप कंदांची निवडणुकीआधीच `फ्रेंडली मॅच` रंगली! 

आमदार पाचर्णें व प्रदीप कंदांची निवडणुकीआधीच `फ्रेंडली मॅच` रंगली! 

कोरेगाव भीमा : शिरुर - हवेली विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णें यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार? तसेच राष्ट्रवादीची उमेदवारी माजी आमदार अशोक पवार यांना की जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांना मिळणार, याबाबत सध्या चर्चां रंगत आहेत.

या पार्श्वभुमीवर वाघोली येथे पुणे जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष पै. संदिप भोंडवे यांनी आयोजित केलेल्या पीटीपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान बोलताना आमदार बाबुराव पाचर्णे व जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी खिलाडुवृत्तीने केलेल्या फटकेबाजीला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

पीटीपीएल क्रिकेट स्पर्धेत आमदार बाबुराव पाचर्णे व जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे एकाच सोफ्यावर बसून सामन्यांचा आनंद घेत होते. यावेळी अंतिम टप्प्यात प्रदीपदादा कंद हवेली हंटर्स संघ विजेता ठरला. यावेळी निकालापुर्वी बोलताना पाचर्णे म्हणाले, ‘सामना अंतिम टप्प्यात आलाय, प्रदिपदादांचा संघ विजयाकडे घोडदौड करतोय. प्रदिपदादा, तुमचा संघ अनेक ठिकाणी विजेता ठरलाय. त्यामुळे बैलगाडा शर्यतीत जसा फळीफोड गाडा असतो, तसेच क्रिकेटमध्येही तुमचा गाडा फळीफोड ठरलाय, आगामी निवडणुकीच्या मैदानात पक्षाने तुम्हाला संधी दिली तर तेथेही तुमचा गाडा फळीफोड ठरेल. त्यासाठी शुभेच्छाही देतो, मात्र पक्षाकडून तुम्हाला संधी मात्र मिळणे आवश्यक आहे. असे सांगायला मात्र आमदार पाचर्णे विसरले नाहीत. 

दरम्यान 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या लढतीतही अशीच मैत्रीपुर्ण लढत होईल का, या निवेदकाने विचारलेल्या प्रश्नावरही आमदार पाचर्णे यांनी तितक्याच मुत्सदीपणाने उत्तर दिले. ते म्हणाले, ‘कोणताही खेळ हा खिलाडूवृत्तीनेच खेळला पाहीजे. त्यातच वेगळा आनंद असतो. निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली लढायचे असते व जिंकायचेही असते. अशावेळी प्रतिस्पर्ध्याला कमी समजायचे नाही. त्यासाठीच अखेरपर्यंत लढायचे आहे.

तर हाच प्रश्न निवेदकाने प्रदिप कंद यांना विचारला असता त्यांनीही खिलाडुपणे उत्तर देताना आपण 2019 च्या रिंगणातला खेळाडु असल्याचे आवर्जुंन सांगितले. ते पुढे म्हणाले, पूर्वीपासून खेळाडु असल्याने हारजीतची भीती मनात कधीच नसते. मात्र मैदानात उतरतानाच जिंकण्याच्याच आत्मविश्वासातून उतरतो. अन्यथा मैदानात उतरतच नाही.
 
यावर आपल्या समोर आमदार पाचर्णेंसारखे अनुभवी स्पर्धक आहेत, अशावेळी काय चित्र असेल, या प्रश्नावर बोलताना प्रदिप कंद म्हणाले, ‘आमदार बाबुराव पाचर्णे यांना पाच निवडणुकांचा अनुभव असल्याने त्यांच्या विषयी आदरच आहे. मात्र विकासाच्या प्रक्रियेत नवीन चेहरे समोर आल्यानंतर जनतेमध्ये नवीन उत्साह दिसतो. आम्हा दोघांचे पक्ष वेगळे असले तरी दोघांची भूमिका मात्र जनतेच्या विकासाचीच असल्याने निवडणुकीत (कोणाला पाठबळ द्यायचे याबाबत) जनतेच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण होईल. असे खिलाडुपणे उत्तर देत पाचर्णे यांचा आदरही राखला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com