निर्मला गावितांनी आणला तीस कोटींचा निधी

मंत्री, शासनाकडून कोट्यावधींच्या योजना अन्‌ घोषणा नवीन नाहीत. मात्र, येथील इगतपुरी मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी प्रशासकीय पुर्तता, नियोजन आणि पाठपुरावा अशा त्रिसुत्री राबविली. त्यातुन मतदारसंघातील एक्याण्णव गावांसाठी तीस कोटींचा निधी मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या.
निर्मला गावितांनी आणला तीस कोटींचा निधी

नाशिक : मंत्री, शासनाकडून कोट्यावधींच्या योजना अन्‌ घोषणा नवीन नाहीत. मात्र, येथील इगतपुरी मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी प्रशासकीय पुर्तता, नियोजन आणि पाठपुरावा अशा त्रिसुत्री राबविली. त्यातुन मतदारसंघातील एक्याण्णव गावांसाठी तीस कोटींचा निधी मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या. त्यामुळे या गावांतील नागरीकांनी त्यांचा सत्कारही केला.

शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत मतदारसंघातील एक्‍क्‍यान्नव गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी तीस कोटींचा निधी मंजूर झाला. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील सर्व प्रमुख गावांची पाणी समस्या दूर होणार आहे. राज्यातील महाबळेश्‍वरनंतर सर्वाधिक पावसाचे तालुके अशी या मतदारसंघाची ओळख आहे. सुमारे तीन हजार मिलीमीटर पाऊस या भागात होतो. राज्यातील सर्वाधिक लांबीची गोदावरी अन्‌ मुंबई शहराला पिण्याचे पाणी देणारी वैतरणा या दोन नद्यांचा उगम याच भागात होतो. 

मात्र, सह्याद्रीचा माथा असल्याने हे सर्व पाणी वाहून जाते. उन्हाळ्यात येथे पिण्यासाठी पाणी नसते. त्यामुळे विविध गावांत ही समस्या तीव्र होती. आदिवासी शेतकऱ्यांसाठी केंद्रीय व राज्य शासनाच्या निधीतुन उपसा सिंचन योजनांची येथे यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. आता 91 गावांना पाणी योजना होणार असल्याने एक मोठा प्रश्‍न निकाली निघेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या योजनांना मंजुरी मिळाल्याने मतदारसंघातील गोंदे दुमालाचे उपसरपंच कमलाकर नाठे, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, विलास मालुंजकर, राजमुद्रा मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप नाठे, सामाजिक कार्यकर्ते समीनभाई खान यांनी त्यांचा सत्कार केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com