वाढदिवसाच्या खर्चातून आमदार झिरवाळांनी काढला धरणातील गाळ

दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला. वाढदिवस साजरा न करता त्यांनी स्वखर्चाने मतदारसंघातील पाहुची बारी धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या दिवशी समारंभ, शुभेच्छांचे कार्यक्रम न करता कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. याद्वारे आमदार झिरवळ यांनी कार्यकर्ते, नेत्यांसाठी एक कृतीशील आदर्श ठेवला आहे.
वाढदिवसाच्या खर्चातून आमदार झिरवाळांनी काढला धरणातील गाळ

नाशिक : दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला. वाढदिवस साजरा न करता त्यांनी स्वखर्चाने मतदारसंघातील पाहुची बारी धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या दिवशी समारंभ, शुभेच्छांचे कार्यक्रम न करता कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. याद्वारे आमदार झिरवळ यांनी कार्यकर्ते, नेत्यांसाठी एक कृतीशील आदर्श ठेवला आहे. 

दिंडोरी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरहरी झीरवळ यांचा उद्या (ता.19) वाढदिवस आहे. दरवर्षी या कालावधीत मतदारसंघात चांगला पाऊस झालेला असतो. यानिमित्त आदिवासी परिसरात आणि त्यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रम होतात. मात्र यंदा दुष्काळाने विविध मोठी धरणे असलेल्या या भागातही टंचाई तसेच पाण्याची कमतरता आहे. परिसरात सिंचनाची मोठी समस्या आहे. त्यामुळे दुष्काळ व त्यातच अद्याप पाऊस नसल्याने नागरीक मोठ्या अडचणीत आहे. पाहुची बारी लघु पाटबंधारेतील गाळ अनेक वर्षांपासून साठलेला होता. गाळ काढण्याचा त्यांचा प्रस्ताव लालफितीत अडकला होता. त्यामुळे त्यांनी स्वतःच जेसीबी व ट्रॅक्‍टरद्वारे रोज दहा ट्रॅक्‍टर गाळ काढण्याचे काम सुरु केले. गेल्या आठवड्यापासून हे काम सुरु झाले आहे. त्यातून धरणाचा पाणीसाठा वाढेल व परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. 

आमदार झिरवाळ यांनी वाढदिवसानिमित्त कोणताही सत्कार स्वीकारणार नसल्याचे सांगत दुष्काळ निवारण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करावे असे आवाहन केले आहे. दिंडोरी- पेठ विधानसभा मतदारसंघात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व समाजातील सर्व घटक अडचणीत सापडले आहेत. अद्याप पाऊस सुरू न झाल्याने सर्वच हवालदिल झाले आहेत. त्यामुळे वाढदिवशी कोणताही सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय आमदार झिरवाळ यांनी जाहीर केला आहे. कुणीही हार, शाल आणू नये, होर्डिंग किंवा शुभेच्छा फलक लावू नये. त्याऐवजी दुष्काळ निवारणासाठी जास्तीत जास्त झाडे लावावीतच, गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस आगळा-वेगळा ठरला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com