mla narayan patil reacion on bala rafik | Sarkarnama

'पैलवान' आमदार नारायणआबांना 'बाला रफिक'च्या वडिलांइतकाच आनंद झालाय!

संपत मोरे
रविवार, 23 डिसेंबर 2018

बालाची आजवरची मेहनत आणि त्याने घेतलेल्या कष्टाच चिज झालं आहे. तो महाराष्ट्र केसरी झाला आहेच  पण तो हिंदकेसरीही होईल. मला तेवढा विश्वास आहे. - नारायण पाटील 

पुणे :  "बाला रफिक शेखचे वडील आदम शेख माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी माझ्यासारखे पैलवान घडवले. त्यांच्यासमोर मी पैलवान झालो. आज त्यांचा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला याचा त्यांना जेवढा आनंद झालाय तेवढाच मला झाला आहे, बालाने आता मागे फिरून पाहू नये, पुढे पुढे जावे. तो हिंदकेसरी होईल याची मला खात्री आहे, "असा विश्वास करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार पैलवान नारायण पाटील यांनी व्यक्त केला.

जालना येथे झालेल्या कुस्ती अधिवेशनात करमाळा तालुक्यातील खडकी येथील बाला रफिक याने महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला. बालाचे वडील आदम शेख हे नामांकित वस्ताद आहेत. आमदार नारायण पाटील यांचे जेष्ठ बंधू श्रीराम पाटील यांचे ते जवळचे मित्र. आमदार पाटील यांना कुस्तीगीर बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे बाला रफिक यांच्या कुस्तीच्या खर्चासाठी आमदार पाटील वेळोवेळी धावले आहेत. त्यांना कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात पाटील यांचा महत्वाचा वाटा आहे. 

आमदार पाटील म्हणतात,"मी त्यांच्यासाठी जे केलं तो काही उपकार नव्हे, आदम यांनी कुस्तीसाठी जे परिश्रम घेतले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा प्रयत्न आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे."

 

 

संबंधित लेख