mla narayan patil give ultimatum to police department | Sarkarnama

करमाळयाचे आमदार सामुहिक आत्मदहन करणार

​अण्णा काळे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

सभापती निवडीच्यावेळी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल व शिवाजीराव बंडगर यांच्यावर झालेल्या हल्लानंतर पोलिसांवर दबाव आणुन 307 चे कलम टाकाला लावल्याचा आमदार नारायण पाटील यांचा आरोप आहे. 

करमाळा : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी झालेल्या भांडणात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यावर दाखल करण्यात आलेला 307 चा खोटा गुन्हा मागे न घेतल्यास सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे. 

जगतापांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे यासाठी शुक्रवार ता.12 रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननावरे, जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अँड राहुल सावंत, बिबिषण आवटे, महेंद्र पाटील, अमोल घाडगे, तात्यासाहेब गोडगे यांच्यासह पाटील व जगताप गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार नारायण पाटील म्हणाले, सभापती निवडीच्या वेळी जी भांडणे झाली त्याचे मी समर्थन करणार नाही, मात्र याप्रकरणात जयवंतराव जगताप यांचे नाव ओवले गेले. त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी बागल गटाने पोलिस यंत्रणेवरदबाव आणुन 307 चा गुन्हा दाखल करायला लावला. केवळ स्टटंबाजी म्हणून सहानभुती मिळावी म्हणुन हे कृत्य केले आहे. 

पोलिस अधिका-यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास करण्यावे व वस्तुस्थितीनुसार कारवाई करावी. जर येत्या शुक्रवार ता. 19 ऑक्टोबर पर्यंत खोटे गुन्हे मागे घेतले नाहीत तर करमाळा पोलिस स्टेशन समोर हजारो कार्यकर्त्यांसह सामुहीक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. 

संबंधित लेख