नारायण पाटील म्हणतात, जगतापांवरील गुन्हे खोटे तर दिग्विजय व रश्मी बागल स्टंटबाज!

दिग्विजय बागल यांच्यावर अकरा वाजता हल्ला झाला, असे फिर्यादीत मान्य असेल तर दिग्विजय बागल उपचाराविना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होते. त्यानंतर मीडियासमोर बोलत होते मांगी येथील समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यानंतर विचार विनिमय करून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका पोहोचविण्याच्या दृष्टीने गुन्हा दाखल करण्याचे नियोजन केले. या वेळी पोलिस स्टेशनसमोर राजकीय भाषणे देखील केली.केवळ राजकीय सहानभुती मिळवण्यासाठी ही सर्व स्टंटबाजी दिग्विजय बागल व रश्मी बागल यांनी केली आहे.- आमदार नारायण पाटील
नारायण पाटील म्हणतात, जगतापांवरील गुन्हे खोटे तर दिग्विजय व रश्मी बागल स्टंटबाज!

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीनिवडीवेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, या मागणीसाठी शुक्रवार ता. 12 रोजी सकाळी 11 वाजता करमाळा तहसील कार्यालयासमोर आमदार नारायण पाटील धरणे आंदोलन करणार आहेत. 

याबाबतचे निवेदन तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन यांना देण्यात आले आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननवरे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब लबडे, बिबिषण आवटे, अण्णा पवार, रायगांवचे सरपंच दादासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 3 ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडी दिवशी विरोधी गटाच्या दिग्विजय बागल व रश्मी बागल यांनी निवडणुकी पुर्वी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी खोटे नाटक व स्टंटबाजी करत निवडणुक प्रणालीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप व नगराध्यक्ष वैभवराजे जगताप याच्यासह कार्यकर्त्यांवर पक्षाचा राजकीय दबाव आणुन करमाळा पोलिसात 307 प्रमाणे खोटे गुन्हे दाखल करण्यास आधिका-यांना भाग पाडले. वास्तविक पाहता योग्य ती चौकशी होऊन गुन्हे दाखल होणे गरजेचे होते. त्यामुळे या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहे. त्यामुळे हे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com