mla narayan patil birthday | Sarkarnama

काट्याच्या लढतीत आमदारकीचा मुकूट मिळवलेला करमाळ्याचा पैलवान! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघातील आमदार नारायण पाटील यांचा आज 52 वा वाढदिवस.   

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघातील आमदार नारायण पाटील यांचा आज 52 वा वाढदिवस. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे ते एकमेव आमदार आहेत. 

महाराष्ट्रातील नावाजलेले पैलवान अशी त्यांची दुसरी ओळख आहे. त्यांनी कुस्तीत राष्ट्रीय पातळीपर्यंत पदके मिळवली आहेत. त्यांची राजकीय सुरवात जेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून झाली. त्यांनी करमाळा बाजार समिती उपसभापती, करमाळा पंचायत समितीचे सभापती, सोलापूर जिल्हा परिषदेचे सलग दोन वेळा सदस्य अशा पदावर काम केले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली (1999) तेव्हा घड्याळाच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. 2009 साली जनसुराज्य पक्षाकडुन निवडणूक लढवली होती. 2014 ला शिवसेनेकडुन ते आमदार झाले. 

संबंधित लेख