गोकुळचे दोन नंबरचे कारभारी मूग गिळून गप्प : आमदार नरकेंची पी.एन. पाटलांवर टिका 

गोकुळचे दोन नंबरचे कारभारी मूग गिळून गप्प : आमदार नरकेंची पी.एन. पाटलांवर टिका 

कोल्हापूर : कुंभी साखर कारखान्याने एफआरपीनुसार दर द्यावा असा जाब विचारणारे गोकुळमध्ये मात्र मूग गिळून गप्प आहेत. कारखान्यांना सभासदांचा हक्क मागितला जातो आणि गोकुळमध्ये शासनाने 27 रुपये दर देण्याचे आदेश दिले असताना 23 ते 25 रुपये दर दिला जात असताना गोकुळेच दोन नंबरचे कारभारी आणि करवीरचे नेते शांत आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना तोंडाला लावून आपण मात्र गोकुळचे लाभ घेणारे या प्रकरणापासून मात्र लांबच आहेत, अशी टीका आमदार चंद्रदीप नरके यांनी माजी आमदार पी. एन. पाटील यांचे नाव न घेता केली. 

कळंबा (ता. करवीर) येथील एका सभागृहात आयोजित करवीर, पन्हाळा, शाहुवाडी तालुक्‍यात गोकुळच्या दूध उत्पादक शेतकरी, संस्थांच्या मेळाव्यात ते बोलत होते. हद्दवाढ विरोध, टोल विरोधाच्या आंदोलनात आपण कार्यकर्त्यांना पुढे केले नाही. आपण स्वत: या आंदोलनात पुढाकार घेतला होता. गोकुळच्या वार्षिक सभेत ही आपण स्वत: हजर राहणार असल्याचे आमदार नरके यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात याचे स्वागत केले.

आमदार नरके म्हणाले, जिल्ह्यातून गोकुळ मल्टिस्टेट होण्याला विरोध केला जात आहे. आमदार सतेज पाटील असो किंवा त्याचे पदाधिकारी असो विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देत आहे. मात्र गोकुळमधील दोन नंबरचे कारभारी नेते कोणतीही प्रतिक्रिया नोंदवत नाहीत. कारण, भविष्यातील लोकसभा, विधानसभा कोणतीही निवडणूक लढविण्यासाठीच गोकुळचा आधार घ्यावा लागतो.

 
करवीर तालुक्‍यातून अजूनही शेकडो दूध संस्था गोकुळला देत आहेत. सभासद गोकुळला आहेत. तरीही, त्यांची केवळ राजकीय विरोधासाठी नोंदणी केली जात नाही. दुसरीकडे मात्र कर्नाटकमधून सभासद गोकुळला करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सभासदांसाठी कुंभी कारखान्यात जेवढा कळवळा आहे, तेवढा कळवळा गोकुळमध्येही दाखवून मल्टिस्टेटचा निर्णय रद्द करावा, असे आव्हान आमदार नरके यांनी दिले आहे. 

आमदार नरके म्हणाले, सभेला येण्यापूर्वी आपण गोकुळचे माजी अध्यक्ष आणि संचालक अरूण नरके यांच्याशी चर्चा केली आहे. तेही मल्टिस्टेटमुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न भविष्यात उद्‌भवणार असल्याचे सांगत होते. आतापर्यंत गोकुळमध्ये ऐवढे चांगले काम केले आहे. तसेच, एनडीडीबीचे अध्यक्ष असतानाही गोकुळमध्ये त्यांचा कोणता मानसन्मान राखला जातो. हे जगजाहीर आहे, अशी टिकाही नरके यांनी केली. 

एफआरपीनूसार दर द्यायला आम्ही बांधिल समजतो. कारखाना तोट्यात असला तरीही तो दर आम्ही देतोच. तसे, दुध दराबाबतही कुंभी कारखान्यामध्ये येणाऱ्यांनी गोकुळमध्येही सभासदांच्याबाबतीत कळवळा दाखवावा, असे आव्हानही नरके यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com