mla mulik irrited by mental hospital actions | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मेंटल हाॅस्पिटलच्या मेंटल कारभाराला आमदार मुळीक वैतागले; कारवाईची मागणी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

विश्रांतवाडी : दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे येरवडा मनोरुग्णालयात रुग्ण आजारी पडण्याचे व प्रसंगी दगावण्याचे प्रमाण वाढले असल्याने तसेच विविध समस्या कायम असल्याने आमदार जगदीश मुळीक यांनी आता संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

विश्रांतवाडी : दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे येरवडा मनोरुग्णालयात रुग्ण आजारी पडण्याचे व प्रसंगी दगावण्याचे प्रमाण वाढले असल्याने तसेच विविध समस्या कायम असल्याने आमदार जगदीश मुळीक यांनी आता संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

मनोरुग्णालयातील कामाबाबत निष्काळजी करणार्‍या कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.  तसेच संपूर्ण रुग्णालयाची स्वच्छता लवकरात लवकर करण्यात यावी व रुग्णांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक देऊन त्यांच्या समस्या दूर करण्यात याव्यात अशा सूचना केल्या.  यासंदर्भात आरोग्य मंत्री यांच्यासमवेत बैठक आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय मुळीक यांच्या वडगाव शेरी मतदारसंघात येते. वेळोवेळी भेटी देऊनही येथील कारभारात लक्षणीय सुधारणा होत नसल्याने त्यांनी आता आरोग्यमंत्र्यांकडे जाऊन कारवाईचा इशारा दिला आहे. आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक संजय देशमुख, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे स्वीय सहायक बलोनिकर, रुग्णालयाचे अधीक्षक अभिजित फडणीस यांच्यासह पाहणी व चर्चा केली.

मनोरुग्णालयाची स्वच्छता योग्य पद्धतीने करण्यात येत नाही, अनेक कक्षांमध्ये दुर्गंधी असल्याने रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे, यामुळे रुग्णांचा आजाराने दगावल्याची अनेक घटना घडल्या आहेत, रुग्णांना हव्या असणार्‍या सुविधा पुरविल्या जात नाही. रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता करत नसल्याने मलेरिया, डेंगू यांसारख्या श्वसनाच्या गंभीर आजारांना समोरे जावे लागत आहे, अशा वेगवेगळ्या समस्या असल्याने ही पाहणी करण्यात आली. 

यावेळी आमदार जगदीश मुळीक यांनी उपचार करून बरे झालेल्या रुग्णांसाठी खुले कक्ष सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडून पाठपुरावा करून सुरू करावा, अशी सूचना केली.

संबंधित लेख