MLA Mohanrao Kadam travels by ST Bus | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

आमदार मोहनराव कदम  कंडक्टरला म्हणाले,"वाजेगाव सहा द्या."

संपत मोरे  
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

चिंचणी ते वाजेगाव असा सहा किलोमीटरचा प्रवास कदम यांनी एसटीतून केला.

पुणे :  आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते आज सकाळी पलूस आगाराची पलूस-पुणे एसटी सुरु करण्यात आली.पलूसवरून चिंचणीत आलेल्या गाडीचे मोहनराव कदम यांनी नारळ फोडून पूजन केले.यावेळी नारळ फोडल्यावर कदम निघून जातील असं लोकांना वाटलं.पण कदम त्यांच्या गाडीच्या चालकाला म्हणाले,"तू जा.मी एसटीने येतो."

अस म्हणत ते एसटीत गेले.ते गेल्यावर सोबत त्यांचे कार्यकर्तेही बसले.मग गाडीत कंडक्टर आल्यावर मोहनरावांनी माणसं मोजली आणि म्हणाले,"वाजेगाव सहा द्या."मोहनराव कदम एसटी बसले हे पाहून लोकांतही आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. चिंचणी ते वाजेगाव असा सहा किलोमीटरचा प्रवास कदम यांनी एसटीतून केला.

यावेळी कदम म्हणाले,"अनेक वर्षांनी एसटीतुन प्रवास करतोय.या प्रवासाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या, एसटीची वाट बघत असल्यावर जेव्हा दूरवर धुरळा उडालेला दिसायचा आणि लाल गाडी दिसायची तेव्हा खूप आनंद व्हायचा.त्या आठवणींनी मनाला खूप बरं वाटतंय.एसटी हा ग्रामीण विकासाचा कणा आहे.सामान्य माणसाला एसटीने विकासाच्या प्रवाहात आणलं आहे."
 

संबंधित लेख