MLA missing from shiv sena's hoardings | Sarkarnama

शिवसेनेच्या होर्डिंग्सरून चक्क आमदारच गायब !

सरकारनामा
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

 डॉ. सुजित मिणचेकर आणि जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यात वादाची ठिणगी पडली. सार्वजनिक कार्यक्रमांतून हा वाद उघडपणे स्पष्ट जाणवू लागला आहे.

हातकणंगले : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यानिमित शिवसेनेच्या वतीने जागोजागी उभारलेल्या  फलकांवरून चक्क हातकणंगले मतदार संघातील शिवसेनेचेच आमदार डॉ. सुजित मिणचेकर गायब आहेत. 

यावरून शिवसैनिकांची त्यांच्यावरील नाराजी आणि शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यांवर आली आहे. याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणूकीत निश्चितच जाणवणार आहेत.

गेली दहा बर्ष डॉ. सुजित मिणचेकर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. शिवसेना -भिमसेना युतीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत. सुरुवातीच्या काळात शिवसेनेत सर्व काही आलबेल होते. मात्र 2014 च्या निवडणूकीपूर्वीच काही दिवस आ. मिणचेकर आणि जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यात वादाची ठिणगी पडली.

 सार्वजनिक कार्यक्रमांतून हा वाद उघडपणे स्पष्ट जाणवू लागला. हा वाद इतका विकोपाला गेला की मुरलीधर जाधव आणि त्यांच्या समर्थकांतून आ. मिणचेकरांच्या उमेदवारीला थेट विरोध केला गेला. निवडणूक तोंडावर असत्याने मिणचेकरांनी जुळवून घेत निवडणूक पार पाडली आणि ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले.

मात्र अलिकडच्या काळात हा वाद परत उफाळून आला आहे. जाधव समर्थकांनी आ. मिणचेकरांना उघड विरोथ सुरू केला आहे. यामुळे शिवसेनेत दोन गट पडलयाचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यानिमित्त जागोजागी फलक उभारले आहेत. 

हातकणंगले तालुक्यांत उभारलेल्या फलकांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जिल्हप्रमुख मुरलीधर जाधव, उपप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील आदींसह काही कार्यकत्याचे फोटो आहेत मात्र यात शिवसेनेचे आमदार डों. सुजित मिणचेकर योना स्थान दिलेले नाही. यातून त्यांच्यावरील नाराजी आणि शिवसेनेतील गटबाजी उघडपणे सर्वांसमोर आल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख