mla medha kulkarni demands 16 tmc water for pune | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

लोकसंख्या 55 लाखांवर पोचली आहे, पुण्याला 16 TMC पाणी द्या!

उमेश घोंगडे  
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुण्याच्या पाणी प्रश्‍नावर आमदार कुलकर्णी यांनी लक्षवेधी दिली आहे.

पुणे : पाणी पुरवठ्यातील कपात टाळण्यासाठी पुणे शहराला 16 टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर करावा, अशा मागणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना या मागणीचे निवेदन देऊन त्यांनी महाजन यांच्याशी चर्चा केली. गेल्या वीस वर्षात पुण्याच्या वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून पुण्याला वाढीव कोटा मंजूर केल्यास पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटेल, असे आमदार कुलकर्णी यांनी सांगितले. 

राज्य सरकार व महापालिका यांच्यात 1997 साली झालेल्या कराराप्रमाणे पुण्याला साडेअकरा टीमएमसी पाणी देण्यात आले होते. मात्र 1997 साली पुण्याची लोकसंख्या सुमारे 22 लाख होती. वीस वर्षानंतर पुण्याची लोकसंख्या 55 लाखांवर पोचली आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात पुण्याच्या पाण्याचा कोटा वाढवून देण्यात यावा, अशी मागणी आमदार कुलकर्णी यांनी केली. यावर विचार करण्याचे आश्‍वासन मंत्री महाजन यांनी दिल्याचे आमदार कुलकर्णी यांनी सांगितले. 

पुण्याच्या पाणी प्रश्‍नावर आमदार कुलकर्णी यांनी लक्षवेधी दिली आहे. मात्र गेल्या दोन दिवसात कामकाज होऊ न शकल्याने निवेदनाच्या माध्यमातून हा विषय किमान जलसंपदा मंत्र्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचा कोटा वाढवून दिल्यास पुण्याचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल. यापूर्वी 2012 साली महापालिकेने 16 टीएमसी पाण्याचा प्रस्ताव तत्कालिन राज्य सरकारकडे दिला होता. मात्र त्यावेळी यावर सहानुभूतीने विचार झाला नाही. यापुढील काळात या विषयाचा पाठपुरावा करून पुण्यासाठी वाढीव पाणी कोटा मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करू, असे आमदार कुलकर्णी यांनी सांगितले. 
 

 

संबंधित लेख