Mla medha kulkarni could not control emotions | Sarkarnama

अन्‌ आमदार मेधा कुलकर्णी यांना रडू कोसळले.... 

उमेश घोंगडे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनामुळे आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरातील सदस्यांना दुपारपर्यंत घरात बसून राहावे लागले. त्यांचा मुलगा सौरभ याच्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी दिली. स्वत: आमदारांना फोन करून अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. दिवसभराच्या उद्विग्न करणाऱ्या घटनामुळे आमदार मेधा कुलकर्णी यांना रडू कोसळले.

या साऱ्या घटनांची माहिती विचारण्यासाठी फोन केला असता. झालेला त्रास सांगताना त्यांना भावना आवरता आल्या नाहीत. "सरकारनामा"शी बोलताना त्या म्हणाल्या की मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात मी सहभागी झाले होते. आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यापेक्षा मी कार्यालयात आहे तेथे या, अशी विनंती मी कालपासून करीत होते. मात्र आंदोलकांनी घरासमोर आंदोलन करून संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरले. गुरूवारी आंदोलनाबद्दल मी नकारत्मक काहीच बोलले नव्हते. मात्र मी न बोललेली वाक्‍ये माझ्या तोंडी घालण्यात येत आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच होणार असल्याचे मी म्हटले होते. मात्र त्याचा विपर्यास करून माझ्याविरोधात जाणीवपूर्वक आंदोलन करण्यात आल्याचे आमदार कुलकर्णी यांनी सांगितले.

आमदार कुलकर्णी यांचा मुलगा सौरभ याच्याविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या महिलांना शिवागाळ केल्याचे त्यात म्हटले आहे.

मात्र असे काही घडलेले नाही. पोलिसांकडे व्हीडीओ शुटींग आहे. त्यांनी ते तपासून पाहावे, असे आमदार कुलकर्णी यांनी सांगितले. एखाद्याच्या घरासमोर जाऊन आंदेलन करणे योग्य आहे का, याचा विचार सर्वानीच करावा, असे आवाहन आमदार कुलकर्णी यांनी केले आहे. 
 
वाचा आधीची बातमी : आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, कोथरुडमध्ये तणाव

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख