मेधाताई हे कुठले गुप्त मतदान?

या देशातील लोक प्रत्यक्ष मतदान करून राष्ट्रपती निवडत नाहीत. तर लोकांनी ज्यांना निवडले ते लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात आणि राष्ट्रपती निवडतात. यातले सगळे प्रतिनिधी हे निवडलेले असतात. हे मतदान गुप्त पद्धतीने होते.
मेधाताई हे कुठले गुप्त मतदान?

मुंबई - लोकशाहीत मतदान हे गुप्त असते. मग राष्ट्रपतीपदाची निवडणूकही त्याला अपवाद कशी ठरावी. पण पुण्याच्या कोथरुडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना मात्र याचा विसर पडला असावा. कारण आपण कुणाला मतदान केले, हे त्यांनी थेट आपल्या 'फेसबूक' पेजवरुनच जाहीर केले आहे.  

या देशातील लोक प्रत्यक्ष मतदान करून राष्ट्रपती निवडत नाहीत. तर लोकांनी ज्यांना निवडले ते लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात आणि राष्ट्रपती निवडतात. यातले सगळे प्रतिनिधी हे निवडलेले असतात. हे मतदान गुप्त पद्धतीने होते. कुणी कुठल्या उमेदवाराला मत दिले हे शेवटपर्यंत कळत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठलाही पक्ष त्यांच्या उमेदवारासाठी वा इतर उमेदवारासाठी व्हीप लागू करू शकत नाही.

आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 'एनडीए' कडून रामनाथ कोविंद तर 'युपीए'कडून मीरा कुमार या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. अन्य ठिकाणांप्रमाणेच विधीमंडळातही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. 'Presidential election started. I was the first person to vote in Maharashtra Vidhansabha for our 'President'Hon. Ramnathji Kovind. Jai Hind!' अशा आशयाची पोस्ट मेधाताईंनी आपल्या फेसबूक पेजवर टाकून आपण कुणाला मतदान केले, ते जाहीर केले आहे. अशाच आशयाचे ट्वीटही त्यांनी केले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल 21 जुलैला लागणार आहे. पण आपल्या पोस्टमध्ये मेधाताईंनी कोविंद यांचा उल्लेख Our President, असा करुन आपल्या बाजूने निकालही जाहीर करुन टाकला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com