mla makarand patil attack bjp government | Sarkarnama

मोदी-फडणवीसांचे सरकार लोकांच्या जीवावर उठले आहे : मकरंद पाटील 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

कवठे (जि. सातारा) : "" नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांचे सरकार जनतेत आभासी चित्र निर्माण करत आहे. देशाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची घोषणा करतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर ते उठले आहेत. रोज विविध प्रकारच्या घोषणांचा पाऊस पाडणारे सरकार प्रत्यक्षात काहीच करत नाही.'' अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी केली. 

युवा पिढी, लहान मुलांबरोबरच आता मोठ्यांनाही मोबाईल, टेलिव्हिजनचे व्यसन जडले आहे. सर्वजण फेसबुक, व्हॉट्‌सऍपसारख्या सोशल मीडियाच्या कृत्रिम दुनियेत वावरत असल्याने समाजाचे मोठे नुकसान होत आहे. विशेषतः युवकांनी वेळीच यातून बाहेर पडून मैदानी खेळ, तसेच कसरतींकडे जाणीपूर्वक लक्ष देत शरीर व मन सुदृढ व सशक्त केले पाहिजे,' असे पाटील म्हणाले. 

कवठे (ता. वाई) येथे पाटील यांच्या आमदार फंडातून एक कोटी नऊ लाख रुपये खर्चाच्या कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 
महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, गोरख सरक, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, आबा सूळ, महाराष्ट्र चॅम्पियन राजेंद्र पवार, शाहू केसरी सतीश भिलारे, विलास देशमुख, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, मनोज पवार, सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पिसाळ, मधुकर भोसले, विजयसिंह नायकवडी, प्रमोद शिंदे उपस्थित होते. 

संबंधित लेख