MLA Mahesh Landge Bhaubij | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आमदार लांडगेंची भाऊबीज 12 बहिणींकडे साजरी

उत्तम कुटे
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

पिंपरी-चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांना सख्खी बहीण नाही. त्यामुळे आमदारांसह तिन्ही भावंडे मानलेल्या एक नव्हे, तर तब्बल 12 बहिणींकडे दरवर्षी भाऊबीज साजरी करतात. त्यानुसार यावेळीही त्यांनी या बहिणींच्या घरी जाऊन भाऊबीज करीत त्यांना साडीचोळी भेट दिली. सार्वजनिक जीवनात वावरताना या बहिणींची ताकद माझे रक्षण करीत असते, अशी भावना त्यांनी या बहिणींची भाऊबीज केल्यानंतर व्यक्त केली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांना सख्खी बहीण नाही. त्यामुळे आमदारांसह तिन्ही भावंडे मानलेल्या एक नव्हे, तर तब्बल 12 बहिणींकडे दरवर्षी भाऊबीज साजरी करतात. त्यानुसार यावेळीही त्यांनी या बहिणींच्या घरी जाऊन भाऊबीज करीत त्यांना साडीचोळी भेट दिली. सार्वजनिक जीवनात वावरताना या बहिणींची ताकद माझे रक्षण करीत असते, अशी भावना त्यांनी या बहिणींची भाऊबीज केल्यानंतर व्यक्त केली.

भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार देत तिच्या घरी भोजन करण्याचा लांडगे यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्या जोडीने त्यांनी गोरगरिबांसोबत दिवाळी साजरी केली. प्रतिवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकीतून अनाथ मुलांना आणि वृद्धाश्रमातही भेटवस्तू दिल्या. गेल्या २० वर्षांपासून आमदार लांडगे  दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करतात. कोणताही बडेजाव न करता गरिबांना दिवाळीत मदत करतात. गरिबांना साखर व धान्य, नवे कपडे व दिवाळीसाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्याचेही वाटप केले जाते.

या संदर्भात आमदार लांडगे म्हणाले की, आपल्या घरी गोडधोड व्हावे, असे प्रत्येक कुटुंबाला वाटते, मुलांना नवे कपडे मिळावे, नातेवाईकांना फराळ द्यावा, असे वाटते. परंतु, प्रत्येकाला हे शक्‍य होत नाही. आर्थिक विवंचनेने दिवाळीही साजरी करू न शकणारी अनेक कुटुंबे असतात. या कुटुंबांना मदत करण्यासाठी माझा भविष्यातही कायम प्रयत्न राहणार आहे. यामधून एक समाधान मला मिळते.

माझ्या १७ बहिणी नगरसेविका...
यावर्षी फेब्रुवारीत झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात १७ नगरसेविकांना आहेत. याबाबत लांडगे म्हणाले, माझ्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे नगरसेवक निवडून आले. निवडणुकीनंतरची ही पहिलीच भाऊबीज आहे. नागरिकांनी ओवाळणी म्हणून माझ्या बहिणींनींना हक्काने महापालिकेत पाठवले ही माझ्यासाठी अविस्मरणीय आठवण आहे.

संबंधित लेख