mla madhuri misal diwali preparations | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

आमदार माधुरी मिसाळांच्या हातच्या चकल्यांची न्यारी चव!

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

पुणे : राजकीय क्षेत्रातील महिलादेखील रोजच्या धकाधकीत पुरूषांइतक्याच व्यस्त असतात. मात्र दिवाळीचा सण महिलांसाठी हा विशेष असतो. सुगरण असलेल्या मग महिला आमदारांनाही रोजचा व्यस्त दिनक्रम बाजून ठेवून स्वयंपाकघर गाठावे लागते. या आमदार मग आपले पाककौशल्य पुन्हा दाखवत कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत करतात. 

असाच अनुभव पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचा आहे. दिवाळीच्या चकल्या आणि भाऊबिजेच्या दिवशी त्यांनी बनविलेली बिर्याणी हे दोन पदार्थ त्यांची हातची खासियत आहेत. दिवाळीचे इतर पदार्थ घरातील इतर महिला बनवत असल्या तरी चकली माधुरीताई स्वतःच बनवतात. चकलीच्या पिठाच्या पूर्वतयारीपासून ते तळणीपर्यंत सारे काम त्या पार पाडतात. हे पदार्थ बनविण्याचा आनंद वेगळाच असतो, असे त्यांनी सरकारनामाला सांगितले.

त्यांचा चकली बनवितानाचा व्हिडीओ सरकारनामाच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आला. त्याला वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला. अनेकांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. चकली बनवताना वर्तनामपत्राचा कागद वापरू नका, असा सल्लाही काहींनी दिला.  

संबंधित लेख